पान:ओळख (Olakh).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतो. त्याच्या तपशिलात या ठिकाणी जाता येणार नाही. कंगले यांनी हा फरक गंभीरपणे विचारात घेतलेला दिसत नाही.

 या सगळ्या विवेचनाचा अर्थ हा की, भरतनाट्यशास्त्र अभिनव भारतीसहित मराठीत अनुवादीत करण्याचे जे प्रचंड काम साहित्य संस्कृती मंडळाने अंगावर घेतले आहे त्यात आपला वाटा उचलण्यात कंगले यशस्वी झालेले आहेत. जिथपर्यंत नाट्यशास्त्राचा आणि अभिनवभारतीचा प्रामाणिक अनुवाद हा प्रश्न आहे तिथपर्यंत कंगले यांचा प्रयत्न अतिशय यशस्वी आणि कौतुकास्पद ठरला असे म्हणता येईल. सगळा प्रश्न विवेचक टीपांचा आहे. कंगले यांच्या टीपा विवेचक आहेत. भरपूर आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. हे मान्य केल्यानंतर अजूनही चिकित्सेच्या दृष्टीने या टीपांमध्ये खूप मोठा बारकावा येण्याची गरज आहे असा याचा अर्थ आहे. जे झाले आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना जे अजून व्हायचे राहिले आहे त्याचे हे अल्पसे दिशादर्शन आहे.

ओळख

८०