पान:ओळख (Olakh).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे काम आहे. मराठीत नाटयशास्त्राच्या सहाव्या-सातव्या अध्यायाचे विश्वसनीय असे सलग भाषांतरच नाही. इतकेही जर कार्य कुणी केले तरी ते महत्त्वाचे मानले पाहिजे. इंग्रजीत सुद्धा सर्व अभिनवभारती डोळ्यांसमोर ठेवून आणि संस्कृत काव्यपरंपरा डोळ्यांसमोर ठेवून सविस्तर टीपा देणारे नाट्यशास्त्राच्या सहाव्या-सातव्या अध्यायाचे भाषांतर परवा परवापर्यंत उपलब्ध नव्हते. गेल्या काही वर्षांत मॅसन आणि पटवर्धन या लेखकांनी या दृष्टीने महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. पण कंगले हे केवळ नाटयशास्त्राच्या भाषांतरावर न थांबता त्यांनी सोबतच संपूर्ण अभिनवभारतीचाही प्रामाणिक अनुवाद दिला आहे. म्हणून या एकाच ग्रंथात मूळ नाटयशास्त्र, मूळ अभिनवभारती दोन्हीचीही प्रमाण भाषांतरे आणि दोन्हीवर सविस्तर अशा विवेचात्मक टीपा एकत्र झालेल्या आहेत. संस्कृत काव्यशास्त्रात रस असणान्या परंतु इंग्रजी भाषेशी संपर्क नसणान्या सर्वच अभ्यासकांची यामळे फार मोठी सोय झाली आहे. भरताला काय म्हणायचे आहे अगर असावे. आणि अभिनव गप्ताला काय म्हणायचे आहे अगर असावे याविषयी एखाद्या तुटक वाक्याच्या आधारे चर्चा करण्यापेक्षा अभिनवगुप्ताचे समग्र विवेचन विश्वसनीय भाषांतरानिशी समोर असणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. विशेषतः अभिनवभारती अनुवादित करणे हे काम सोपे नाही. कारण अभिनव भारतीत भ्रष्टपाठ पुष्कळ आहेत. अभिनवभारती प्रथम छापताना कै. रामकृष्ण कवी यांनी खूपच परिश्रम घेतले; पण तरीही जटिल प्रश्न तसेच शिल्लक राहिलेले आहेत. कै. कवींच्या नंतर सुशील कुमार डे, रामशास्त्री शिरोमणी, डॉ.राघवन, डॉ. मकर्जी, आचार्य विश्वेश्वर, इटालियन संशोधक ग्लोली आणि अगदी अलीकडे मॅसन-पटवर्धन ह्या मडळींनी पाठशुद्धीच्या दृष्टीने पुष्कळ प्रयत्न केलेले आहेत. कंगले यांनी आधीचे हे सर्व प्रयत्न काळजीपूर्वक अभ्यासून त्यात पुन्हा ठिकठिकाणी भर घातलेली आहे. म्हणून 'अभिनव भारती भाषांतरित करण्यासाठी तिच्या पाठशुद्धीचेही खूप मोठे प्रयत्न करणे भाग असते. त्याचे मोल सहज करता येणे शक्य नाही. कंगले यांनी परिश्रमात कसूर कोणतेही ठेवलेली नाही. अगदी अलीकडे अभिनवभारतीच्या काही भागाचा आढळ । कल्पलता विवेक' ह्या ग्रंथात झाला. सातव्या अध्यायावरील अभिनवभारती प्रायः अनुपलब्धच आहे. 'कल्पलता विवेका' तील उल्लेखांच्या आधारे काही प्रमाणात अभिनवगुप्तांची सातव्या अध्यायावरील टोका आपण समजून घेऊ शकतो. कंगले यांनी या नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीचाही यथायोग्य वापर केलेला आहे. या सर्व परिश्रमांमळे त्यांचे ' रसभाव विचार ' हे पुस्तक त्यांच्याच लौकिकाला साजेसे असे तर झालेलेच आहे पण शिवाय या ग्रंथामुळे मराठी भाषेत संस्कृत काव्य

ओळख

८०