पान:ओळख (Olakh).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ताच प्रकार नाही. सर्व प्रकारची क्षमता असून सुद्धा । दीडो पानांत मांडून दाखवितो ' अशा एखाद्या कल्पनेच्या आहारी जाऊन ते लिहितात. अशा स्थल विवेचनात निदान विवाद्य प्रश्नांना हात घालू नये अशी अपेक्षा असते. पण मधून मधून अशा प्रकारच्या वादांना कंगल्यांनी स्पर्श करणे भागच असते. मूळ पुस्तकच फारसे खोलात जाणारे नसल्यामुळे त्यात विवाद्य विंधाने किती आहेत, संस्कृत काव्यशास्त्रज्ञांच्या मूळ भूमिकेपासून वाजूला सरकणारे विवेचन किती आहे, याची तपशिलाने चर्चा करण्यातच अर्थ नाही. पण परीक्षण करायचे म्हटल्यानंतर काहीतरी म्हणायला पाहिजे यासाठी म्हणून एक-दोन ठिकाणे सहजगत्या नोंदवतो. भरतानंतर नाट्यशास्त्रावरचा एक अधिकारी लेखक म्हणन कोहल मानण्यात येतो. या कोहलाची भरतनाटयशास्त्रातच भरतपुत्र म्हणून गणना आहे. हे गृहित धरून आपण एक मत असे मांडू शकतो की, आज आपल्यासमोर जो ग्रंथ भरतनाट्यशास्त्र म्हणून आहे त्याची रचना पूर्ण होण्यापूर्वीच्या काळात होऊन गेलेला प्रसिद्ध नाटयसंगीतज्ज्ञ आणि भरतपुत्र कोहल या नावाचा आहे. म्हणून कोहल ही ऐतिहासिक व्यक्ती असेल तर, ती नाट्यशास्त्रापूर्वीची आहे. आणि ऐतिहासिक व्यक्ती नसेल तर, कोहलाची कल्पना ही नाट्यशास्त्राला प्राचीन असणारी कल्पना आहे. कोहलाच्या काळासंबंधी एक भूमिका ही असू शकते. दुसरी भूमिका ही असू शकते की, अभिनवगुप्ताने जे कोहलासंबंधी उल्लेख केलेले आहेत ते पाहताना असे दिसते की, कोहल नाटककार हर्षाच्या नांद्यांचा उल्लेख करीत आहे म्हणून कोहलाचा काळ उद्भटापूर्वीचा आणि हर्षानंतरचा म्हणजेच सातव्या शतकातला मानला पाहिजे. म. म. काणे यांनी या दुस-या भूमिकेचा स्वीकार केला आहे. या दोन्ही भूमिका सोडून देऊन कंगले ज्यावेळी कोहलाचा काळ इ. सनाचे ४ थे, ५ वे शतक असावे असे म्हणतात (पहा-पष्ठ ९, प्राचीन काव्यशास्त्र) त्यावेळी असे म्हणणे भाग आहे की, हे मत एकदमच विलक्षण आहे. पुराव्याच्या आधारे विचार करण्याच्या कोणत्याच सूत्रात ते बसत नाही. कंगले यांनी हे मत देण्यापर्वी काहीतरी विचार केलेला असेलच; पण त्यांनी विचार काय केला याची या संक्षिप्त विवेचनात नोंद नाही आणि मला त्यांनी विचार कसा केला असेल याचे अनमानही करता येत नाही.

 एके ठिकाणी कंगले यांनी असे मत दिले आहे की, नाटयदर्पणकार रामचंद्र आणि गुणचंद्र यांचे विवेचन भरत नाट्यशास्त्राला धरूनच आहे. अनेक जागी हे लेखक अभिनवगप्ताचा अनुवाद करतात. परंतु एका बाबतीत त्यांचा अभिनवगुप्ताशी मतभेद आहे. संस्कृत काव्यशास्त्राचा कुणीही अभ्यासक गंभीरपणे या पद्धतीने मत देणार नाही. ज्या दोन लेखकांच्या भमिका प्रायः एक

७८

ओळख