पान:ओळख (Olakh).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारक वाटत नाही असा माझ्या म्हणण्याचा आशय आहे. पण यामुळे तर्कतीर्थांच्या विवेचनाची मौलिकता कमी होत नाही. वाङमय समीक्षेसारख्या क्षेत्रात निविवाद भूमिका फारच थोड्या असतात. उलट असे वाद संपले तर या शास्त्रातील जिवंतपणाच संपून जाईल. खरे महत्त्व विचारांना चालना आणि दिशा देण्याचे असते. ते काम तर्कतीर्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशी धन्यवादास पात्रआहेत

ओळख

७५