पान:ओळख (Olakh).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाच मद्दा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल. आपण विभावाची कल्पना कशी स्पष्ट करणार? नाट्यशास्त्राच्या मूळ संहितेत आलंबन विभाव आणि उद्दीपनविभाव अशी विभागणी नाही. संहितेतील सर्व भावांची उदाहरणे उद्दीपन विभावाचीच आहेत. पण संस्कृत साहित्यशास्त्राला अनुसरून आपण आलंबन विभाव ही कल्पना समजावन घेऊ. दुष्यंताच्या मनात शकुंतलेविषयी प्रेम निर्माण होते. याठिकाणी स्थायीभाव रती हा दुष्यंताचा आहे आणि आलंबनविभाव शकुंतला आहे. आलंबन विभाव नाटयांतर्गत प्रकृती असते. उद्दीपन विभावही नाट्यांतर्गत असतो. म्हणन स्थायीभावाचा आश्रय नाटयांतर्गत होतो. हे स्थायीभाव विभाव, अनुभाव, व्यभिचारींनी संयुक्त होऊन रस होतात. म्हणजे स्थायीभावच रस होतो हा स्थायीभाव जर आस्वाद नसून आस्वाद्य आहे असे म्हटले, आणि तेच भरताला म्हणायचे आहे, तर स्वायीभावाचा आश्रय कधीही भरत नाट्यशास्त्रात नाटकीय प्रकृतींच्या बाहेर असू शकत नाही.
 वरील विवेचनाच्या संदर्भात मढेकरांचा प्रश्न पुन्हा एकदा विचारला पाहिजे, तो हा की, स्थायीभावात कुणाचे मन अभिप्रेत आहे. अभिनवगुप्ताला अनुसरून आपण सुसंगतपणे हे म्हणू शकतो की हे मन रसिकांचे आहे. भरत नाटयशास्त्रापुरता विचार केला तर सुसंगतपणे हे मन नाट्यांतर्गत प्रकृतीचे आहे. या ठिकाणी अडचण ही निर्माण होते की स्थायी भावात फक्त नाटयांतर्गत व्यक्तींचे मनच गृहीत आहे असे म्हटले म्हणजे भरतप्रणीत रसव्यवस्था आजच्या विकसित वाङमयाला मोठया प्रमाणात अप्रस्तुत होते. कारण आजच्या वाङमयात रस पाहण्यासाठी कवीची विवक्षा आणि रसिकाचे मनच आपण पाह शकतो. कै. बंडेकरांनी यामुळेच रसव्यवस्थेचे महत्त्व फक्त ऐतिहासिक अभ्यासापुरते मर्यादित केलेले आहे. कारण ज्या वाङमयाच्या संदर्भात व ज्या जीवनात रससिद्धांत निर्माण होतो ते जीवन आणि ते वाङमय आता बदलन गेलेले आहे. आणि ज्या वेळेला अभिनवगुप्ताप्रमाणे आपण आस्वाद म्हणजे रस ही भूमिका घेऊन विचार करू लागतो त्यावेळी नाट्यशास्त्राशी विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद पत्करूनही रमव्यवस्था आजच्या वाङमयाला पूरे पडत नाहीच. मढेकरांचा आक्षेप भरताच्या मांडणीवर विनतोड आहे. फार तर भरताच्या बाजने एवढेच म्हणता येईल की जे वाङमय त्याच्यासमोर होते त्या आधारे तो विचार करीत गेला ही त्याची मर्यादा त्याला ओलांडता आली नाही. हा भरताचा दोष नव्हे. कारण विचार मोठ्या प्रमाणात आपल्या काळाला बांधलेला असा असतो.

 मकरांच्या ज्या दोन भूमिकांचा प्रतिवाद म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विवेचन करतात त्या दोन्ही भूमिकांचा त्यांचा प्रतिवाद मला समाधान

७४

ओळख