पान:ओळख (Olakh).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही पण ती भारताची आहे याला इलाज नाही एकदा हा अंगाचा मुदा ग्रहित धरला म्हणजे मग अस्वाध रस द्र मानसिक काबार्ध गृहीत घरणे अतिशय कठीण होऊन जाते
 या तिस-या व्याख्यानात शास्त्रीबुवांचा मुख्य हेतू रसव्यवस्थेवरील मढेकरांच्या एका मूलगामी आक्षेपांचा परिहार करणे हा आहे. मकरांचे म्हणणे असे की वाङमयाचा विचार करताना भावनांचे दोन गट लक्षात घ्यावे लागतात. यांपैकी भावनांचा एक गट हा नाट्यांतर्गत व्यक्तींच्या भावनांचा गट असतो. आणि दुसरा रसिकांचा असतो. या दोन गटांत रसशास्त्र एकसूत्रीपणा दाखवू शकत नाही. रसांमध्ये काही वेळा वाङमयांतर्गत व्यक्तींच्या भावनांचा गट स्थायीभाव म्हणून सांगितलेला असतो. काही वेळा रसिक प्रेक्षकांच्या भावनांचा गट स्थायीभाव म्हणून सांगितलेला असतो. वाङमयीन व्यक्तींच्या भावना आणि रसिकांच्या भावना हे दोन गट कधी परस्परांशी सुसंगत असतात, कधी विसंगत असतात. स्थायीभाव म्हणताना कुणाचे मन अभिप्रेत समजावे याचे सुसंगत उत्तर दिल्याशिवाय रसव्यवस्था स्वीकारार्ह ठरू शकणार नाही, रसव्यवस्थेवरील मढेकरांचा हा आक्षेप मलगामी आक्षेप आहे. कुणालाही जरी झाले तरी या आक्षेपाचे उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. बहुतेकवेळी मढेकरांचा हा आक्षेप मूलगामी आहे याचीच दखल घेतली जात नाही. तर्कतीर्थांनी या मूलगामी आक्षेपाची दखल घेऊन त्यांना उतर देण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे.

 तर्कतीर्थाचे या आक्षेपाला उत्तर असे की, स्थायीभावात कुणाचे मन अभिप्रेत असते. या प्रश्नाचे उत्तर कवीची विवक्षा लक्षात घेऊन द्यावे लागते. तर्कतीर्थांनी दिलेले उत्तर नुसते फसवेच नसून त्यांच्या स्वतःच्या भूमिकेशी विसंवादी आहे. अभिनवगुप्तादी मंडळी रस आस्वाद्य मानत नसुन रस आस्वादरूप मानतात. रस आस्वादरूप मानतानाच ते रसिकाला सहृदय म्हणजे कवीच्या अंतःकरणाशी तन्मय झालेला असे मानतात. अभिनवगुप्तांच्या व म्हणून मम्मट, विश्वनाथ, जगन्नाथाच्या विवेचनात ही कविरसिकांची तन्मयता गृहीतच असते. त्यामळे त्याठिकाणी सुसंगतपणे सर्वत्र स्थायीभावात रसिकाचे मन गहीत धरलेले असते. म्हणजेच कवीची विवक्षा गृहीत धरून स्थायीभावाचा आश्रय ठरविलेला असतो. अभिनव गुप्तांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात, रससूत्रात मनींनी स्थायीभावांचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नाही. कारण हा उल्लेख शल्यभूत ठरला असता. विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी यांच्या संयोगाने आस्वाद व्यापाराची निष्पत्ती होते. स्थायीभाव निर्माण होत नसतो. तो रसिक हृदयातच सुप्त असतो. या व्यापामुळे तो फक्त व्यक्त होतो. आपल्या भूमिके

ओळख

७२