Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खांडेकर व माडखोलकर हे दोघेही आज हयात नाहीत पण त्यांच्या स्मृती मनात नेहमीच ताज्या राहतील.
 ‘कर्ण' ह्या विषयावर मला अनेकदा लिहावे लागले. मी अनेकदा कर्णावर बोललोही आहे. माझे मित्र आनंद साधले ह्यांच्या 'महापुरुष' कादंबरीवर तिक्रिया नोंदविताना प्रा. सुशीला पाटील ह्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहताना, शिरवाडकरांचे · कौंतेय ' शिकवताना असे अनेकदा कर्णाविषयी विचार करणे भाग पडले. साररूपाने ते सगळे म्हणणे — सूर्यपुत्रच्या' परीक्षणात आलेले आहे.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्यावरील पुस्तक हा दुःखाचा व दुर्दैवाचा भाग आहे. मित्र कर्तव्य म्हणून प्रा. शेवाळकरांनी ते पुस्तक छापले. त्या माझ्या मित्राच्या दुर्दैवाने व्यथित होऊन मी ते परीक्षण लिहिले. त्या परीक्षणात ग्रंथात काय आले आहे ह्यापेक्षा काय आलेले नाही ह्याचाच विस्तार ह्यामुळे झाला. .. इतर ग्रंथ परीक्षणाविषयी मुद्दाम काही सांगण्याची गरज नाही. ते ग्रंथ मला महत्त्वाचे वाटले मी लिहिले. माझे मतभेदही प्रसंगी नोंदविले. त्या त्या विषयाचे महत्त्वाचे निवेदन तपासून पाहणे हे कर्तव्यच असते. ते मी माझ्या कुवतीनुसार केले आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांनी ही परीक्षणे निवडली. त्यांनी निवड केली ती मी मान्य केली. साहित्य साधनेने प्रकाशनाची जबाबदारी घेतली. त्या सर्वांच्या ऋणात मी आहे. । - नरहर कुरुंदकरे