पान:ओळख (Olakh).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तील कर्णाचा आनंद हरवलेला आहे. कर्ण जिद्दीने युद्धाला उभा राहतो आणि युद्ध जिकतो. युद्ध जिंकताक्षणी त्याच्या हे लक्षात येते की हा विजय तुच्छ होता. कारण इथे आणीबाणीची वेळच नव्हती. निर्णायक क्षणावर आपण विजय मिळविलेलाच नव्हता. असा निर्णायक क्षण जर आला असता तर भूमीने आपले चाक गिळले असते. आपली अस्त्रविद्या विस्मत झाली असती. तसे काहीच घडलेले दिसत नाही. त्याअर्थी हा फार निर्णायक विजयाचा क्षण नव्हे. कुठेतरी कर्णाला अशी जाणीव आहे की निर्णायक क्षणी आपल्याला अपयश येणार आहे. ज्या बाजूकडून आपण प्रतिष्ठा पणाला लावून लढ़ ती बाजू आणि आपण दोघेही अपयशी होणार आहोत. विजयातील आनंद नाहीसा करणा-या जीवघेण्या जाणिवेमळे एकीकडे कर्ण अतिशय साशंक झालेला आहे. स्वतःच्या पराक्रम आणि सामर्थ्याविषयी त्याच्या मनात एक न्यनगंड निर्माण झालेला आहे. तो झाकण्यासाठी कर्ण दपोक्तीने, उर्मटपणे बोलतो. या सर्व उद्धटपणात आपल्या मनाशीच जपलेले आपले, निर्णायक क्षणी अपयश येणार, या जाणीवेचे शल्य तो झाकू इच्छितो आणि दुसरीकडे या निर्णायक क्षणाच्या अनिवार ओढीमुळे तो सारखा मरणाच्या क्षणाचा शोध घेत आहे. कर्णाचे सततचे पराक्रम हा त्याचा मृत्यूचा शोध घेण्याचा एक आविष्कार आहे. त्याची दानशूरता स्वतःला पारखा झालेल्या, विजयातील आनंद हरवलेल्या माणसाची वैराग्यमूलक अशी धडपड आहे. आपण हीनकुलीन आहोत असे कर्णाला वाटतच नाही. कारण जन्मजात कवचकुंडले, असामान्य सौंदर्य व पराक्रम यांमुळे आपण तसे नाही हे कर्णाला माहीतच आहे. लोक आपण सूतपुत्र असल्यामुळे आपला उपहास करतात याचेही त्याला फारसे शल्य नाही. कारण असा उपहास करणारे मूर्ख व अडाणी आहेत असेच त्याला वाटत असले पाहिजे. शल्य आहे ते हे की आपण कोण आहोत हेच आपल्याला माहीत नाहो.

 स्वतःला पारखा झालेला माणस योगायोगाने जिथे चिटकला तिथे चिटकला इतकाच त्याच्या मित्रप्रीतीचा अर्थ आहे. स्वतःची ओळख विसरलेल्या माणसाकडून पाप-पुण्य विवेक घडतच नसतो. म्हणून कर्ण पुण्याचाही आधारस्तंभ आहे. तो दानशूरांचा अग्रणी आहे. तो पापांचाही सहभागी आहे. दुर्योधनरूपी पापवृक्षाचा बुधा आहे. रणांगणावर सर्वांना हतबुद्ध करणारा पराक्रमही तो करतो. मधून मधून रणांगण सोडून पळूनही जातो. कातडी सोलून कवचकुंडले दान करणारा तो दानवीरही आहे. अभिषिक्त महाराणीला नहमीच वेश्या समजणारा तो क्षद्रही आहे. स्वतःलाच हरवलेल्या माणसाची हो सारी लक्षणे आहेत. कर्णजीवनाच्या विसंगतीतील ही सुसंगती आहे. मानन नोन रणांगणावर दहा दिवस गैरहजरही राहतो. अर्जुनासाठी ठेवणे

ओळख

५५