पान:ओळख (Olakh).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



चांगल्या-वाईटाची सर्व टोके आत्मसात करणारे सहस्र पातळीवरील जीवन म्हटले तर कृष्ण चांगल्या वाईटाच्या लक्ष छटा स्वतःच्या व्यक्तित्वात बाळगणारा आणि सारे विसंवाद स्वतःत सुसंगत करणारा संस्कृती आणि प्रकृतीचा नेता आहे. कधी अतिरेकी प्रेम वाटले तर मला या पात्राविषयी वाटते. जो लीलया कुलनाशाचा शाप तटस्थपणे स्वीकारतो पण प्रतिशाप देत नाही. हे आत्यंतिक प्रेम सोडले तर महाभारतात ज्यांच्या अभ्यासाचे आकर्षण वाटावे अशी पात्रे खप आहेत. माझ्यासाठी कर्ण ही अशा आकर्षणाचा विषय आहे.
 पण कर्णाविषयीचे आकर्षण त्यातल्या गतागतीच्या समद्धीमळे आहे. तो महादानशूर आणि दीर्घद्वेष्टा एकाच वेळी आहे. महापराक्रमी आणि दुर्दैवी एकाच वेळी आहे. आपल्या सुखी संसारात आकंठ बुडालेला व हळवेपणाने या सुखाची आठवण कृष्णासमोर करणारा आणि उपेक्षेच्या आगीत जळणारा एकाच वेळी आहे. प्राणपणाने दुर्योधनाशी एकनिष्ठ राहणारा पण अत्यंत अहंमन्य असल्यामुळे कुठेही तादात्म्य न पावू शकणारा एकाच वेळी आहे. या कर्णाच्या जटिल व्यक्तिमत्वात मला स्थिरपणे दिसत असतील तर त्या दोन जाणिवा आहेत. या दोन्ही जाणिवा त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना उदास करणा-या अशा आहेत.
 यांपैकी पहिली जाणीव मी कोण ? ही आहे. कुठेतरी कर्णात आपणच आपल्या स्वतःला हरवलेलो आहो ही जाणीव आहे. आपल्या सांस्कृतिक पद्धतीप्रमाणे कर्णांच्या शरीरावर जन्मजात कवचकुंडले आहेत. इतर कुणाच्याही शरीरावर अशी जन्मजात कवचकुंडले नाहीत. तेव्हा आपण निराळे आहोत. राधा-अधिरथाचे पुत्र नाहीत हे कर्णाला बुद्धीचा उदय झात्याबरोबर कळलेले असणार. प्रश्न इतकाच आहे की आपण राधेय नाही हे त्याला माहीत आहे. आपण कोण आहोत याचा जन्मभर त्याचा शोध चाल आहे. ज्यावेळेला माणस स्वतःचा अनुबंध विसरतो, आपणच आपल्याला पारखे झालेले आहोत असे वाटन तो स्वतःचा शोध घेऊ लागतो त्यावेळेला ही एक न संपणारी कथा मानली पाहिजे. कुठेतरी त्याला आपले व सूर्याचे नाते जाणवलेले आहे. त्यामळे कर्ण सूर्यभक्त झाला आहे. पण नेमके सूर्याचे व आपले नाते काय हे त्याला माहीत नाही. त्यामुळे त्याचा स्वतःचाच शोध अधिक दुःखपूर्ण झाला असणार. मी कोण या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडतच नाही. जेव्हा ते उत्तर सापडते त्यावेळी आपण कोण हे कळाल्यामुळे कर्णाचे दुःख वाढलेले असणार, ते कमी झालेले नाही.

  कर्णातील दुसरा भाग त्याच्या शापांचा आहे. संस्कृतीने हेही सत्य मान्य केलेले आहे. पण या सत्याचे मानसशास्त्रीय स्वरूप असे आहे की, सर्व विजया

ओळख

५४