पान:ओळख (Olakh).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संपतो. हस्तिनापूरची गादी कौरवांची, इंद्रप्रस्थाची गादी पांडवांची असा तो निर्णय आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. त्यात युधिष्ठिराने जुवा खेळन राज्य गमावले. शेवटी प्रश्न असा निर्माण झाला की बारा वर्षे वनवास आणि एक वर्षे अज्ञातवास पूर्ण झालेला आहे की नाही? कालगणनेच्या एका पद्धतीनुसार हा काळ पूर्ण होतो. दुसन्या पद्धतीप्रमाणे हा काळ पूर्ण होत नाही. म्हणून या प्रश्नाचा निकाल रणमैदावर लावला जातो. समकालीन बहुमत पाहिले तर ते कौरवांच्या बाजूने गेलेले दिसते. विजय पांडवांचा झालेला आहे. दोन्ही बाजूंनी सोयीनुसार धर्म वापरला जातो. कौरव पांडवांना लाखेच्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न करतात हेही सज्जनपणाचे नव्हे आणि पांडव स्वतः सुटण्यासाठी एक निरपराध बाई पाच मुलांसह या घरात जाळन मारतात हेही मोठे उदात्त कृत्य नव्हे. म्हणून या घटनांच्या आधारे न्याय्य बाजू कुणाची याचे उत्तर देता येणे शक्य नाही. वरे दुर्योधन देव विरोधी, वेदविरोधी, गायीब्राह्मण व प्रजा यांचा छळ करणारा पापी म्हणावा तर तसेही दिसत नाही. दुर्योधनाचे वैर फक्त पांडवांशी आहे. तेव्हा यात धर्माधर्माचा प्रश्न उपस्थित होऊ नये. पण संस्कृतीने हा प्रश्न उपस्थित केला आहे.
 आमच्या संस्कृतीच्या दृष्टीने श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष भगवान. त्याचा अवतार दुष्ट दंडणासाठी आणि धर्म सस्थापनेसाठी झालेला आहे. हा प्रत्यक्ष परमेश्वर पांडवांच्या वाजूने उभा आहे. कारण पांडव भक्त आहेत. म्हणन जी परमेश्वराची बाज व जी भक्तांची बाजू ती आमच्या संस्कृतीच्या मते न्यायाची, सत्याची व धर्माची बाजू आहे. पांडवांची बाजू न्यायाची, सत्याची व धर्माची मानल्याशिवाय पांडवांचा विजय म्हणजे धर्मरक्षण ठरत नाही. आणि जोपर्यंत पांडवजयात धर्मरक्षण, धर्मसंस्थापना या कल्पना आपण गृहीत धरीत नाहीत तोपर्यंत आत्मबलिदान आणि आत्महत्या यांत फरक करता येत नाही. म्हणन मुद्दाम महाभारतात हे सांगण्यात आले आहे की दुर्योधनाच्या रूपाने राक्षसाची बाजू उभी होती. दुर्योधनाने प्रायोपेवशन करण्याचा प्रयत्न करताच दानवांनी त्याची समजूत काढली. ही समजूत काढणारा वनपर्वांतला जो भाग आहे त्यात सर्वांच्या बरोबर कर्णाच्या रूपानेही असुर उभा असल्याचे सांगितले आहे. कर्णाला या ठिकाणी कृष्णाने मारलेल्या नरकासुराचा आश्रय आहे. (३-२४०१९, ३२) पांडवांची बाजू देवांची व भक्तांची, कौरवांची बाजू असुरांची व दुष्टांची अशी संस्कृतीची मान्यता आहे.

 या संदर्भात कर्ण धर्मरक्षणार्थ आत्मबलिदान करतो असे मानायचे असेल तर कर्णाला कधीतरी हे मान्य करणे भाग आहे की कृष्ण भगवान परमेश्वर आहे, पांडव त्याचे भक्त आहेत, पांडवांची बाज न्यायाची असून

ओळख

५२