________________
प्रस्तावना वेळोवेळी लिहिलेल्या ग्रंथपरीक्षण स्वरूपाच्या लेखांचा हा संग्रह आहे. त्याचे नाव ओळख असे ठेवण्याचा हेतु हो इतरांची ‘ओळख' आहे हे सांगण्याचा तर आहेच पण इतरांची ओळख करून देताना न कळत आपलीही ओळख इतरांना होते ही जाणीवही त्यामागे आहे. कै. भाऊसाहेव खांडेकरांची माझ्यावर कृपा होती. त्यांच्या ययाती ह्या कादंबरीचे मला जाणवणारे दोष मी 'धार आणि कांठ' मध्ये नोंदविलेले आहेत. ययातीला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक ज्या समितीने दिले त्या समितीचा मी एक सभासद होतो. खांडेकरांच्या ह्या कादंबरीला प्रतीकात्मकतेचे जे मल्य आहे ते विचारात घेऊन समितीने पारितोषिक दिले होते. पुढे ययातीला साहित्य अॅकॅडमीचे पारितोषिक मिळाले. ज्ञानपीठ पारितोषिकही मिळाले. ह्या कादंबरीतील दोष मान्य करून अजून तिच्या निमित्ताने जे बोलण्या-सांगण्याजोगे आहे ते मी इथे एकत्र मांडलेले आहे. ____ कै. भाऊसाहेब माडखोलकरांचाही माझ्यावर फार लोभ होता. त्यांना माझे कौतुक फार असे. आपले प्रत्येक पुस्तक ते मला भेट पाठवीत. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्या एका पुस्तकास प्रस्तावना लिहिण्यास मला भाग पाडले आहे. त्यांच्या आग्रहा___ खातर मी ‘जन्म दुर्दैवीचे' परीक्षण लिहिले.