पान:ओळख (Olakh).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



-वांच्या बाजुला येण्याची विनंती केली होती. तुला द्रौपदी मिळेल असे आमिषही दाखवले होते. तरीही कर्ण दुर्योधनाला चिटकून राहिला हे कर्णाच्या मित्रनिष्ठेचे उज्ज्वल स्थल आहे. आज आपल्यासमोर जे महाभारत आहे त्यात हे स्थळ टिकून आहे. पण समजा जर कर्णाने कृष्णाची विनंती मान्य केली असती तर काय झाले असते ? या प्रश्नाचे सरळ उत्तर देता येणे कठीण होते. कारण महाभारत बारकाईने पाहणाऱ्या सर्वांचे हे मत आहे की युधिष्ठिराचे राजकारण नेहमीच कृष्णाच्या सल्ल्याने चालत नसे. उलट या राजकारणात कृष्णाला आपली इच्छा असो वा नसो भाग घ्यावा लागत असे. पण या चिकित्सेत मी या ठिकाणी जाणार नाही.

 कर्ण हा परशुरामाकडे विद्या शिक्षणार्थ जातो ही घटना केव्हाची समजावयाची हाही एक वाद आहे. रंगमंडपात कौरवपांडवांनी आपले कौशल्य दाखवले या घटनेपूर्वी ही घटना घडली असे समजावे की या घटनेनंतर कर्ण परशुरामाकडे गेला असे समजावे. जर कर्ण रंगदर्शनापूर्वी परशरामाकडे गेला असेल तर मग रंगदर्शनाच्या वेळी कर्णाला दोन्ही शाप मिळालेले आहेत असे मानावे लागेल. रंगदर्शनापूर्वीच कर्णाने द्रोणाचे शिष्यत्व सोडले असे समजावे लागेल. जर ही घटना रंगदर्शनानंतरची असेल तर मग कर्णाला दुर्योधनाला सांगनच परशुरामाकडे जाणे भाग आहे. कारण आता कणं अंगदेशाचा राजा आहे. कर्णाला परशुरामाकडे चोरून राहायचे आहे. कारण त्याला खोटे वोलन ब्रह्मास्त्र मिळवायचे आहे. कोणत्याही मार्गाने आपण गेलो तरी या ठिकाणचा विसंवाद टाळू शकत नाही. जर कर्ण सर्वांना सांगून निघाला असेल तर द्रोणाच्या गुरूकडे त्याला चोरून जाता येणे शक्य नाही. कारण द्रोणांनी ती व्यवस्था केली असती. एरवी हा प्रसंग रंगदर्शनापूर्वीचा मानावा लागतो. रंगदर्शनापूर्वी कर्णाला द्रोणाचार्याला सोडून जाता येणे शक्य नाहीका परशरामाने शाप दिला अशीही कथा आहे. या शापामुळे कर्ण अस्त्र विद्या विसरायला हवा होता. पण शेवटपर्यंत अस्त्रविद्या त्याच्याकडे टिकन राहिली अशीही कया आहे. खरे म्हणजे या ब्रह्मास्त्राला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. कारण ब्रह्मास्त्र अनेकांजवळ होते आणि अस्त्रविद्या महाभारताच्या यडात प्रभावी झालेली दिसत नाही. सर्व मोठे वीर शस्त्राघातानेच मरतात. अस्त्राचे वर्णन हे यद्धवर्णन वाढविण्यापुरते असते. कर्ण दानशूर होता हे सर्वमान्य आहे. याचक विन्मुख न दवडण्याचे कर्णाचे व्रत हे असुरी व्रत होते असा अचिकित्सक आवृत्तीचा अभिप्राय आहे. महाभारतातील शद्वांचा पुरावा पहिला तर कर्णाचे कवचकुंडलदान हे दान नसून तो विनिमय आहे. याही ठिकाणी एक सांस्कृतिक सत्य म्हणून मी कवचकुंडलदान हे महादान मानण्यास तयार आहे.

ओळख-४

४९