पान:ओळख (Olakh).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




दुर्योधनाने कर्णाला दिले आहे. काही जण हा प्रसंग प्रक्षिप्त मानतात. कारण दुर्योधन स्वतःच जर राजा नव्हता तर तो राज्य कसे देणार? हे मानणारी मंडळी जरासंधाने कर्णाच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन त्याला मालिनीनगरी दिली व अशारीतीने कर्ण अंगदेशाचा राजा झाला हे जास्त ग्राह्य मानतात. काही जण जरासंधाची ही कथाच प्रक्षिप्त मानतात. विसंवाद आढळला की, त्यातील एक प्रकार प्रक्षिप्त मानायचा असे हे तत्त्व आहे. पण हे विसंवाद 'एके ठिकाणी नसून अनेक ठिकाणी आहेत, एका ठिकाणानुसार कर्णाची मांडी कोरणारा किडा इंद्र होता. हीच प्रसिद्ध कथा आहे. दुसन्या ठिकाणानुसार तो एक शापित असुर होता. एका प्रथेनुसार पंडूचे दहन जंगलात झाले तिथे माद्री सती गेली. दुस-या परंपरेनुसार पंडूचा मृतदेह हस्तिनापुराला आणला. तिथे पंडूचे दहन झाले. या विसंवादातील अजून कुणाचे लक्ष न गेलेला अजून एक मजेदार विसंवाद आहे. कर्ण हा भीष्म सेनापती असेतो न लढण्याचे ठरवन युद्धातून बाहेर गेला असेही महाभारतात आहे. पण भगवद्गीतेनुसार योद्धयांची जी वर्णने आलेली आहेत. त्यात रणमैदानावर कर्ण आहे आणि हे द्रोणाचार्यांना प्रत्यक्ष दुर्योधनच सांगत असल्यामुळे आपला नाइलाज आहे आणि गीता हा महाभारताचा अतिशय प्राचीन भाग आहे. हे सगळे मुद्दाम सांगण्याचे कारण असे की, महाभारतात अनेक परंपरांनी अनेक कथा येतात व त्या कथा नेहमीच सुसंवादी असतात असे नाही. त्यांच्यात असणारा विसंवाद प्रक्षेपांचा पुरावा नसतो. उलट असे सगळे विसंवाद सुसंगत करून दाखवणे हेच प्रक्षेपांचे एक कार्य आहे. म्हणनच दक्षिणी परंपरेत असा उल्लेख आलेला आहे की, दुर्योधनाने सर्व ज्येष्ठांची संमती घेऊन नंतर कर्णाला अंगदेशाचे राज्य दिले. देशमुख यांना हाही उल्लेख महत्त्वाचा वाटतो. याचे कारण हे की, त्यांना सर्व सुसंगत आणि भरघोस मद्दे मळातील वाटतात. चिकित्सक प्रतीने महाभारत अधिक सुसंगत आणि रेखीव केलेले नसन ठिकठिकाणी सुसंगती आणणारी उत्तरकालीन भर प्रक्षिप्त ठरवून जागजागी ह्या कथेचा त्रुटितपणा उघड केला आहे.

 कर्णाशी कृष्णाची भेट आधी झाली की कुंतीची हा एक वादाचा मुद्दा आहे. देशमुख कुंतीची भेट आधी मानतात. महाभारतीय पुरावा असा आहे की, कृष्णकर्णाची भेट विफल झाली त्यामुळे उद्विग्न झालेली कुंती कर्णाकडे गेली. जर आपण कुंती आधी भेटली असे मानले बर या अध्यायाचा सगळा संदर्भच प्रक्षिप्त मानावा लागेल. जे नीलकंठीप्रत प्रमाण मानते, जे चिकित्सक आवृत्ती प्रमाण मानते तेही प्रक्षिप्त ठरवावयाचे असेल तर त्यासाठी कारणे द्यावी लागतात. ' असे वाटते की...' हे कारण त्याला पुरणारे नव्हे. कारणे नेहमी ग्रंथांतून द्यावी लागतात. कृष्णाने कर्णाला तू सूर्यपुत्र आहेस सांगून पांड

४८

ओळख