पान:ओळख (Olakh).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसतो. कर्ण नेहमीच असा बीभत्स असेल असे नाही. पण या क्षणी तो अशारीतीने वागला, बोलला. इथे त्याचा तोल गेला असे देशमुखही म्हणतात. पण ते पुन्हा सांगतात की, कर्णाने प्रत्यक्ष हीन कृती मात्र केलेली नाही. कर्ण हा धर्मात्मा म्हणून प्रसिद्ध होता. शिवाय ज्येष्ठ होता. त्याने द्रौपदीची वस्त्रे फेड हे दुःशासनाला सुचविल्यानंतर खरे म्हटले तर दुःशासन पापमुक्त होतो. कर्णाने स्वतः द्रौपदीचे वस्त्रहरण करावयास पाहिजे होते असे देशमुखांना वाटते काय? एरवी चिकित्सक आवृत्ती सोडून देणारे नेमक्या या ठिकाणी नीलकंठी प्रतीचा आधार सोडतात. प्रत्यक्ष परमेश्वराने प्रकट होऊन या स्थळी दौपदीचे लज्जारक्षण केले आहे असे संस्कृतीचे म्हणणे आहे. चिकित्सक आवृत्तीने हा मुद्दा सोडून दिला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, देशमुखसुद्धा द्रौपदीचे वस्त्रहरण सुदैवाने टळले असे मानतात.

 कर्ण याच ठिकाणी अशाप्रकारे का वागतो याचे स्पष्टीकरण देण्यासाठी द्रौपदीने आपल्या स्वयंवरात सूतपुत्र म्हणून त्याची हेटाळणी केली होती हा मुद्दा उपस्थित केला जातो. चिकित्सक आवृत्तीनुसार धनुष्याला वाण लावण्यासाठी कर्ण उठलेला नाही म्हणून हा प्रकार घडलेला नाही. कर्णाविषयी प्रेम असणान्यांना चिकित्सक आवृत्ती न आवडण्याचे हे मुख्य कारण आहे. कर्णाच्या मनाचा हिणकसपणा क्षम्य ठरविणारी एक जागाच यामुळे निघन जाते. द्रौपदी मी सूतपुत्राला वरणार नाही असे म्हणाली हा मुद्दा इ. स. १००० नंतरचा आहे. माधवाचार्यांनी महाभारताविषयी जी तात्पर्यदीपिका लिहिली आहे तिच्यानसार कर्णाने मत्स्यभेद करण्याचा प्रयत्न केला पण त्याला धनुष्य वाकविणे जमले नाही. हे तर कर्णाचे पक्षपाती मुळीच कबूल करणार नाहीत. यापेक्षा त्याने स्वयंवरात भागच घेतला नाही हे म्हणणे परवडेल. मी स्वतः द्रौपदी कर्णाला हिणवन वोलली, तिने स्वयंवर प्रसंगी हेटाळणी केली हे संस्कृतीला मान्य असणारे एक स्थळ समजतो. फक्त ते उत्तरकालीन संस्कृतीने मान्य केलेले स्थळ आहे असे स्पष्टीकरण देतो. पण त्यामळे काय ठरेल ? यामुळे कर्ण उदार मनाचा पराक्रमी पुरुष ठरणार नाही. दंश मनातल्या मनात जतन करून वेळ आल्यावर फुत्कार सोडणारा तो खुनशी माणूस ठरेल. कर्ण असा खुनशी होता हेच' जर कोणाला म्हणावयाचे असेल तर आपण कोण अडथळा करणार ? कारण नीलकंठी प्रतीत त्याला आधार आहे. आणि जर कुणाला कर्णाची ही वागणूक क्षम्य वाटत असेल तर त्यालाही माझी हरकत नाही. कारण उभय बाजूची स्खलने महाभारतात आहेत. मात्र यानंतर पांडवांनी अधर्माने एकवीर मारला असे कोणी म्हणू नये. पांडवांची ही वागणूक क्षम्यच मानली पाहिजे. एकेकाची न्यायबुद्धी फक्त पांडवांपुरती जागी असते. त्यालाही माझी हरकत नाही. फक्त ते व्यासाचे मनोगत आहे असे म्हणू नये.

ओळख

४६