पान:ओळख (Olakh).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावनाप्रधान मनोवृत्तीचा खेळ आहे. कर्णाचे हळवे कोमल मन, त्याचे भावविश्व कसकसे हादरत गेले, तो कसकसा कडवट बनत गेला, एका मानी. पराक्रमी मनाला उपेक्षेच्या झळा कशा सहन कराव्या लागल्या. इ. इ. या सर्व मनोरंजक स्वप्नविलासांना मूळ महाभारतात आधार नाही. महाभारतात जो कर्ण आहे त्याला लहानपणी राधा आणि अधिरथाचे प्रेम मिळाले आहे. किंचित मोठा होताच तो सर्वांबरोबर द्रोणाचा शिष्य आणि दुर्योधनाचा मित्र बनला आहे. ऐन तारुण्यात त्याला अंगदेशाचे राज्य मिळाले. पुढे म्हातारपणापर्यंत धन, संपत्ती, मान्यता, प्रतिष्ठा, बायका, मुले, दासदासी आणि सुखोपभोग यांत कर्णाला काही कमी पडले नाही. तो पराक्रमी म्हणन ख्यात होता. दाता म्हणून मान्य होता. राजा दुर्योधनाचा जीवलग सखा होता. हे सगळे उपेक्षित आणि मानहानीचे जीवन नव्हे. खरी गोष्ट अशी आहे की, मधली काही वर्षे सोडली तर पांडवाचे आयष्य म्हातारपणापर्यंत कष्टात गेलेले, त्यांना राज्य म्हातारपणी मिळते. त्यावेळी सुख घेण्याची सर्व इच्छा संपून गेलेली असते. कर्ण हा नेहमी सत्तावैभव आणि प्रतिष्ठा यांच्या बाजने राहिला. त्याची निंदा करणारे समकालीन दुर्योधनाच्या राज्यात अप्रतिष्ठित होते. तो स्वतः राजकारणाचा सूत्रचालक नेता होता. हे चित्र सतत उपेक्षेच्या झळा सहन करणान्या भाबड्या जिवाचे नाही. हा भाबडेपणा कर्णावर लादण्याचे कारण नाही.
 ऐन कर्णवधाच्यापूर्वी थोडावेळ कर्णाचा पराक्रमी मलगा मारला गेला. डबडवलेल्या डोळचांनी भावनांचे कढ आणि दुःख मनातल्या मनात दाबीत कर्ण कसा लढ़ लागला याचे मोठे गोंडस वर्णन लेखकांना करून पाहता येण्याजोगे आहे. हे वर्णन करताना जेव्हा घटोत्कच मारला गेला तेव्हा भीम, ज्यावेळी अभिमन्य मारला गेला तेव्हा अर्जन यांचेही डोळे असेच भरून आले असतील याचा विसर जर पडणार नसेल तर युद्ध भीषण असते इतकाच याचा अर्थ आहे. या महाभारतात दुःखाची गोष्ट अशी आहे की, रणभूमीवरील भीषण भवितव्यता युधिष्ठिराला जाणवलेली आहे. तो युद्ध संपल्यानंतर विजयी झाल्यानंतर फुरसतीच्यावेळी शोक करीत बसला आणि मोठ्या दुःखाने लोकाग्रहास्तव गादीवर बसला. हे पूढचे दुःख जाणवले असेल तर ते अर्जनाला जाणवले आहे. महाभारतातील सर्वांत परक्रमी पुरुषाला युद्धाचा भयानकपणा सर्वांत तीव्रपणे जाणवला. यानिमित्ताने भारतीयांचा सर्वांत मान्य तत्त्वज्ञानग्रंथ जन्माला येतो. महाभारतकारांनी या अर्जुनाला लुगडे नेसवून, पायांत चाळ बांधन विराटाच्या जनानखान्यात नाचायला लावले आहे. सवानाच भव्यता देणारा आणि दुसऱ्या हाताने सर्वांचीच भव्यता काढून घणारा हा विलक्षण ग्रंथ आहे.

४४

ओळख