पान:ओळख (Olakh).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 चिकित्सक आवृत्ती प्रमाण मानावयाची नसेल तर मान नये पण ज्या नीलकंठी प्रतीला देशमुख प्रमाण मानतात ती नीलकंठ प्रत कर्णाला विशेषणं कोणती लावते हे तर देशमुखांना पाहणे भाग आहे. चिकित्सक आवृत्तीत कर्णाला लावण्यात येणाऱ्या विशेषणांची परिश्रमपूर्वक आणि साधार वर्गवारी डॉ. वाळिंबे यांनी दिली आहे. हे वाळिंबे यांचे विवेचन देशमुखांना ज्ञात होते. प्रस्तावनेत त्यांनी तसा उल्लेख केला आहे. चिकित्सक आवृत्ती कर्णाला जी विशेषणे लावते ती सर्व विशेषणे नीलकंठीप्रतीत सहज उपलब्ध होती आणि नीलकंठी प्रतीला व्यासाचे मनोगत समजण्याची देशमखांची इच्छा आहे, तर मग या विशेषणांच्या रूपाने व्यासाचे मनोगत त्यांच्यासमोर स्पष्ट होते. महाभारतातील कर्णाला लावण्यात येणारी विशेषणे दोन गटांत पडतात. दानशूर, पराक्रमो, दयाळू, गुणज्ञ, सत्यवादी, तपस्वी, एकांतिक, मित्रनिष्ठ अशा प्रकारची कर्णाचा मोठेपणा सांगणारी ही विशेषणे आहेत. दूसरा गट कर्णाला दोष देणान्या विशेषणांचा आहे. या विशेषणांत पापपुरुष, दुरात्मा, पुरुषाधम, अल्पचेतन, नित्यद्वेष्टा, नीच, क्रूर ही विशेषणे आहेत. आदिपर्वात पर्वसंग्रह सांगताना असे म्हटले आहे की, दुर्योधन या पापवृक्षाचा कर्ण हा बंधा होता. उद्योगपर्वात धृतराष्ट्राने असे म्हटले आहे की हे दुर्योधना कर्ण सांगेल तसे तू वागतोस. कर्ण हा तुझा कारियता आहे. (५-५७-९). तूच सर्व वैराचे मूळ आहेस असे तर अनेकांनी कर्णाला म्हटले आहे. नुसते कर्णपर्व जरी पाहिले तरी कर्णपर्वाच्या शेवटी कर्णवधाचे दु:ख आहे. कर्णाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हाहाकार माजला. एक धर्मात्मा आणि दानशूर मारला गेला असेही या अध्यायाच्या शेवटी आहे आणि कर्णाचा वध हे धर्मसंस्थापन आहे, त्यामुळे एक पाप सपले असेही म्हटले आहे. महाभारतातील कर्ण हा नुसता पराक्रमी आणि दानशरच नाही, तर तो भारतकारांच्या मते पापी आणि नीच ही आहे. विशेषणांचा हा नेमका पसारा विसरून जाऊन ज्यावेळेला लेखक कर्णाचे गुणगान करू लागतात त्यावेळी त्यांना हे सांगणे भाग आहे की, कर्णाविषयीचे हे तुमचे ममत्त्व आपण जरूर बाळगा, महाभारतात कर्णाला अनकल असणा-या गोष्टी मूळच्या व ख-या असून कर्णाच्या थोरवीला विरोधी जाणाऱ्या बावी सर्व उत्तरकालीन भाकड कथा आहेत असे आपण जरूर समजा, पण ही आपली समजत प्रगट करताना ते व्यासाचे मनोगत आहे हे प्रतिपादन करण्याचा हट्ट आपण न धरला तर बरे


 हा नुसता शैलीचा भाग नसून याला कथानकातील घटनांचीही बाजू आहे. कर्णाकडे पाहताना सर्व समाजाने उपेक्षा आणि अवहेलना केलेला, भाबडा आणि हळवा जीव या पद्धतीने पाहणे हा आधुनिक लेखकांच्या स्वतःच्या


ओळख

४३