पान:ओळख (Olakh).pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पष्ट उल्लेख आहे. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीतही हा उल्लेख आहे. (८-६७-८). तेव्हा कर्णाची अस्त्रविद्या शेवटच्या काळीसुद्धा नष्ट झालेली नव्हती असे मानणे भाग आहे. एका अर्थी आपला मृत्युकाळ अजून समीप आलेला नाही असे कर्णाला वाटणे याची ही सूचना होती. पण तरीही कर्ण लढण्याचा प्रयत्न न करता मत्य पत्करतो. देशमुखांना कर्णवध हे आत्मबलिदान, आत्मसमर्पण वाटण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण असे आहे. दुसरी गोष्ट अशी की, भीष्म-द्रोण बाजला झाल्यानंतर कौरवांच्या सर्व आशा कर्णावरच केंद्रित झालेल्या आहेत. कर्णवध ही दुर्योधनाच्या पराभवाची निश्चिती आहे. एक तर जिवलग मित्र म्हणून आणि दुसरी म्हणजे गरज म्हणत. कर्णाच्या रक्षणाचा आटोकाट प्रयत्न करणे हे सर्व कौरवांचे कर्तव्य आहे. कर्णाचा वध हा भारतीय युद्धाचा उपान्त्य म्हणजे सतरावा दिवस आहे. या दिवशी सकाळी कर्णाने दुर्योधनाला आपल्या अडचणी सांगितलेल्या होत्या. कृष्णासारखा कुशल सारथा आपल्याला नाही ही त्याची पहिली अडचण आहे. सारथ्य करण्यासाठी शल्य देऊन ही अडचण भागविण्यात आली. आपणाजवळ अक्षय बाण भाता नाही ही कर्याची दुसरी अडचण आहे. अधनमधून रथ मोडतात ही एक उपअडचण आहे. कर्णाच्या मागे बाणांनी भरलेले गाडे व असंख्य रथ सज्ज करण्याची व कर्णाला एकटे न पड़ देण्याची जबाबदारी दुर्योधनाने घेतली आहे. जर ही जबाबदारी दुर्योधनाने पार पाडली असती तर रथाचे चाक जमिनीत अडकले हा मुद्दा उपस्थित झाला नसता. रथाचे चाक काढण्यासाठी साहाय्यकांनी प्रयत्न केले असते. कर्णाला नवा रथ देण्यात आला असता. पण या ऐन क्षणी दुर्योधनाने त्याला दिलेले साहाय्य हरवल्यासारखे दिसते आणि कर्ण एकटा पडतो. कर्ण एकटा पडतो ही गोष्ट महाभारतातील उल्लेखावरून सिद्ध करता येते. ऐनवेळी दुर्योधनाने आपल्याला सोडले असे जर कर्णाला या क्षणी वाटले असेल तर कर्णाची ही जाणीव पुराव्याशी सुसंगत आहे. या जाणिवेमळे कर्ण आत्मबलिदानाला सिद्ध झाला असे देशमुखांचे म्हणणे आहे. आत्मबलिदानाला काहीतरी कारण लागते. ते कारण देशमुखांनी गतपापाचे प्रायश्चित्त व धर्मरक्षण असे नोंदवलेले आहे. या चितनाच्या निमित्ताने कर्णाजवळ शेवटपर्यंत अस्त्रविद्या होती आणि शेवटी कर्ण एकाकी पडला हे दोन महत्त्वाचे मामिक व अलक्षित मुद्दे समोर आलेले आहेत. फक्त चिकित्सक आवृत्ती आधारासाठी घेऊनसुद्धा देशमुखांना हे दोन मुद्दे मांडता आले असते.

 महाभारताचा विचार कसा करावा हा एक विवाद्य प्रश्न आहे. याबाबत एकच एक आणि सर्वमान्य अशी पद्धत कधीच कोणाला ठरवन देता येणे शक्य नाही. आज आपल्यासमोर महाभारताच्या ज्या निरनिराळ्य

३५

ओळख