करून सूडही घेतला नाही. अहंमन्य, आतताई व सूडतत्पर देवयानी अशी देवयानीची हीणकस व्यक्तिरेखा आधुनिकांनी निर्माण केलेली आहे.
शुक्राचार्यांनी ययातीला विवाहाचे वेळी हे मुद्दाम सांगितलेले आहे की राजा, ही शर्मिष्ठा आज जरी दासी असली, तरी पूजनीय राजकन्या आहे. तिला शयनकर्मासाठी म्हणजे रतीसाठी आवाहन करू नकोस (११७६ । ३४). शक्राच्या या आदेशात एक खोच आहे. दासी ह्या धन्याच्या स्वाधीन असतात. त्योचा उपभोग हा स्वामीचा हक्कच आहे. राजा ही राजकन्या आहे, तिच्या प्रतिष्ठेला जप; तिला सामान्य दासी समजू नकोस. ह्या सूचनेत राजकन्येच्या प्रतिष्ठेची काळजी आहे, तशीच देवयानीच्या कल्याणाचीही काळजी आहे. ययातीने हे मान्य केले. देवयानीसह ययाती राजधानीस आला व सुखाने संसार करू लागला. देवयानीचे राजाशी कधी भांडणही झाले नाही व त्याच्या सुखात व्यत्ययही आला नाही. भांडणाचा प्रसंगही आला नाही. अशा सुखात अनेक वर्षे गेली (१ । ७७ । ६). महाभारताच्या या कथेत सर्वत्र हजार वर्षाचा उल्लेख आहे. तरुण कच विद्येसाठी आश्रमात आला तेव्हा देवयानी तरुण होती. कचाचा एकूण विद्याभ्यास एक हजार वर्षाचा आहे (१ । ७२ । ७८). नंतर देवयानीची ययातीशी भेट होते. अक्षरशः इथे काळ हजार वर्षाचा घेतला तर ययातीशी विवाह करताना देवयानी १०१८ वर्षाची तरी मानावी लागेल. पुढे पतिपत्नीची हजार वर्षे सुखात गेली म्हटल्यावर पहिले मूल होताना देवयानी २०१८ वर्षाची मानावी लागेल. म्हणून ह्या कथेत हजार वर्षे याचा अर्थ दीर्घकाळ असाच करणे भाग आहे. यानंतर देवयानीने आपल्या यदु या ज्येष्ठ पुत्राला जन्म दिला. देवयानी ययातीशी समरस होऊ शकली नाही ही आधुनिकांची कल्पना आहे. महाभारतातील देवयानीने कधी कचाची आठवण केली नाही. कधी ययातीच्या सुखाचा भंग केला नाही. ती ययातीसह संसारात . रमली.
अशोकवनात राहणाऱ्या शर्मिष्ठेने विचारपूर्वक पुढाकार घेतला. तिने ययातीला आवाहन केले व भोग मागितला (११७७।११). शमिष्ठेला पुत्र झाल्यावर देवयानीने विचारणा केली. शमिष्ठेने देवयानीची फसवणूक केली व आपण ऋषीकडून भोगदान घेतल्याचे सांगितले (१ । ७८ । ३, ४). अशारीतीने देवयानीला दोन मले झाली. शमिष्ठेला तीन मले झाली. शर्मिष्ठेला ययातीकडून तीन मुले झाल्याचे कळाल्यानंतर शुक्राचार्यांचा शाप येतो व राजा ययाती म्हातारा होतो. (१ । ७८ । ३०). कथेच्या दुसन्या परंपरेत राजाला अकालघोर जरा आल्याचा उल्लेख आहे. पण शुक्राच्या शापाचा उल्लेख नाही. ययातीचे म्हणणे असे की मला अजून तप्त होईपावेतो भोग मिळालेला नाही. माझ्या
ओळख