पान:ओळख (Olakh).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अध्यात्मवाद्यांचा जडवाद्यांवर नेहमी असा आक्षेप राहिला की, जडवादी हे भोगवादी आहेत. हा आक्षेप खरा नव्हे. काहीं अध्यात्मवादी भोगवादी आहेत, म्हणून अध्यात्मवाद भोगवाद ठरत नाही; काही जड़वादी भोगवीदी आहेत म्हणन-जडवाद हा भोगवाद नसतो. जगाचे वैचित्र्यच ह्यात आहे की, जडवादातील भोगवाद्यांना अध्यात्मवाद्यांनी आपले सहकारी मानले आहे. व जडवादातील भोगविरोधकांना अध्यात्मवाद्यांनी भोगवादी ठरवून धिक्कारार्ह मानले आहे. समाजवादी हे जडवादी खरे, पण ते भोगविरोधक व संयमवादी आहेत. खांडेकरांची मांडणी नुसती जडवाद्यांची नाही. ती समाजवादी जडवाद्यांची मांडणी आहे. म्हणून त्यांच्या कथानकाला एक संयमाचा प्रतिनिधी लागतो. मूळ महाभारतात संजीवनी विद्या घेऊन स्वर्गात निघून गेल्यानंतर कच पुनः ह्या कथेत येत नाही. साने गुरुजींनी सर्पसत्राची नवी मांडणी करताना आस्तिक नव्याने उभा केला. खाडेकरांनी ययातीच्या कथेची फेरमांडणी करताना कच नव्याने उभा केला. भोग विरुद्ध संयम, त्याग विरुद्ध संयम, असा हा यती-ययाती-कचाचा त्रिकोण आहे.

 समाजवाद ही मूलत: एका नैतिक समाजाच्या उभारणीची प्रक्रिया आहे. स्वतः समाजवादी हे आर्थिक भाषेत बोलतात, हे खरे आहे. पण तुम्ही त्यांना विचारा : एकाने दुस-याची लट करण्यास हरकत काय आहे ? लगेच ते म्हणतील हा अन्याय आहे, हा अन्याय आम्ही चालू देणार नाही. तुम्ही त्यांना विचारा जर सर्वांनाच सारखे दरिद्री व गुलाम केले, तर समता येणार नाही का? लगेच ते सांगतील स्वातंत्र्य हा समतेचा गाभा आहे., समाजवाद्यांना अन्यायरहित स्वतंत्र मानवी समाज हवा असतो, व ह्या समाजात सर्वांना अभय आणि प्रतिष्ठा हवी असते. अशा वेळी संयम हाच मध्यवर्ती महा होऊन जातो; एकाचे स्वातंत्र्य म्हणजे इतरांचे दास्य व्हायला नको असेल तर स्वातंत्र्यांचा उदय भोगेच्छेतून नव्हे, संयमातून व्हायला हवा. ज्या समाजवाद्यांना आपल्या तवज्ञानातील आशय तीव्रपणे जाणवला, त्यांच्यावर गांधींजींचा प्रभाव पडणे भागच होते. कच हा गांधीवादाने प्रभावित झालेला समाजवादी आहे (साने गुरुजींसारखा); किंवा समाजवादाने प्रभावित झालेला गांधीवादी आहे. (आचार्य भागवतांसारखा.). हा कच ह्या कथेत सर्वांत प्रभावित करणारा नेता असणार, हे उघडच आहे. मूळची ययातीची कथा इथे त्रिकोणी होते. खांडेकरांची मांडणीच पुढे शिरवाडकरांनी स्वीकारलेली आहे. ययातीला महाभारतात दुवळा आधार होता. कचाने गांधीप्रमाणे वागावे ह्याला आधार महाभारतात नाही. तो आधार खांडेकरांच्या वैचारिक निष्ठेत शोधायला हवा.

२२

ओळख