________________
वासनामय, भोगलंपट राजाची कहाणी नाही. महाभारतातील कथा एका पुण्यवान पराक्रमी सम्राटाची व त्याला सर्व सूखासमाधानात सहकार्य करणाऱ्या त्याच्या पत्नीची आर्ष कथा आहे. अशा कथेत भाऊंना रस वाटला नसता. मूळ महाभारताच्या आदिपर्वात एक उपाख्यान म्हणन ययातीची कथा येते. तिथे ही कथा अ० ७० ते अ० ८८ अशी १९ अध्यायात पसरलेली आहे. जनमेजयाला त्याच्या पराक्रमी पूर्वजांच्या कथा सांगताना ही कथा आलेली आहे. मुळातच ही अतिप्राचीन व पूज्य पूर्वजांची परंपरागत कथा आहे. तिचा उत्तरार्ध बराच विस्कळीत आहे. पूर्वार्ध सुद्धा दोन भिन्न परंपरांनी-संग्रहित झालेला आहे. कथा दोन भिन्न परंपरांनी संग्रहित होते आहे म्हणून तिच्यात घटनांचे थोडे थोडे फरक आहेत. पण आशयाच्या दृष्टीने हे फरक महत्त्वाचे नाहीत. नंतरच्या काळात ह्या कथेत फारसे प्रक्षेपही घुसलेले दिसत नाहीत. खांडेकरांसारख्या आधनिक कादंबरीकाराला मळीसुद्धा न आवड. णारे असे महाभारतातील कथानक आहे. ययाती हा पांडवांचा पूर्वज, प्रतिष्ठानचा राजा आणि पराक्रमी नहुषाचा मुलगा आहे. पुरुरवा-नहष आणि ययाती ही तीन नावे ऋग्वेदात येणारी आहेत. ययाती हा वेदातील सूक्तद्रष्टा ऋषी आहे. महाभारतातही ययातीला वेदज्ञ व तत्त्वनच मानले आहे. सर्वत्र त्याचा उल्लेख सम्राट, अपरजित, सत्यपराक्रम म्हणून येतो. एका परंपरेप्रमाणे राजा ययाती शिकारीसाठी अरण्यात गेला. तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो विहिरीवर गेला. त्याला एक तरुणी विहिरीत पडलेली दिसली. ती त्याने बाहेर काढली. ही तरुणी देवयानी होती. दुसन्या परंपरेप्रमाणे सख्यांसह उपवनात विहार करताना देवयानी ययातीला दिसली. पण दोन्ही परंपरांना समान महा असा की देवयानी राजा ययातीवर भाळली. तिने पुढाकार घेतला. ययातीची व पिता शुक्राचार्याची आपल्या विवाहास समती तिने मिळवली. पुराणांमध्ये पुरुषांवर लुब्ध होणान्या, पुढाकार घेणान्या सुंदरींच्या पुष्कळ कथा आहेत. त्यापैकी ही एक. लंपट ययाती देखण्या स्त्रियांवर भाळतो व विवाहाचा प्रस्ताव मांडतो अशी रचना महाभारतात नाही. देवयानीने ययातीसह दीर्घकाळ सुखाने संसार केला. देवयानीने कधी कचाची आठवण काढलेली नाही. देवयानीचे मन कचाच्या ठिकाणी गंतल्यामुळे ती ययातीच्या सहवासात रमू शकली नाही. ह्या आधुनिकांच्या स्पष्टीकरणाला महाभारतात आधार नाही. . देवयानीने मिष्ठेला दासी केले हे खरेच आहे. पण आगळिक व अहंता शर्मिष्ठेची होती देवयानीने दासी शमिष्ठेला उपवनात सुखात ठेवले. दरक्षणी, शर्मिष्ठेचा सूड घेऊ पाहणारी देवयानी भारतात नाही. भारतातील देवयानी मद्यांसह सर्व सूखांचा आस्वाद घेणारी, पतिनिष्ठ व संसारात रमणारी आहे. ओळख.