Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यानंतर पुनः मूळ पदावर येतात. इ. म. १९३५ ला जी पिढी ऐन पंचविशीत होती, त्या पिढीचे खांडेकर हे आवडते कादंबरीकार ! इ. स. १९४० ला तर मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षच होते. इ. स. १९५'५ ला अगदी नवी पिढी अस्तित्वात आली होती. आचाराने विचाराने ह्याकाळी जे पंचविशीत होते ते जुन्या मंडळीपेक्षा निराळे होते. वाङमयाचे सारे जगच बदलून गेलेले होते. इ. स. १९३५ ला खांडेकर पंचविशीत नसले तरी त्या तरुणांशी निदान कल्पनेने एकरूप होऊ शकत होते, वीस वर्षानंतर तेही संपले होते. इ. स. १९७५ ला अजून एक नवी पिढी उदयाला आलेली आहे. तरीही खांडेकर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेतच. जे. इ. स. १९३५ ला ऐन तारुण्यात होते ते आता म्हातारे झालेले आहेत. आजा, बाप व नात मिळून ययातीवर प्रेम फरतात असा ह्याचा अर्थ आहे. तीन पिढयांतील लाखो तरुणांच्या मनावर आपले प्रभत्व ठेवणान्याच्या लेखणीत काही मामर्थ्य, काही गण असायलाच हवेत. ते कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी आपली आहे असे समीक्षकांना वाटतच नाही. कंटाळवाणा लेखक लोकप्रिय नमतो इतके तरी भान आपण ठेवायला हवे आहे असेही ह्या मंडळींना जाणवत नाही.
 आणि खांडेकर फक्त मराठीतच लोकप्रिय नव्हते. ते गजराथी, तामीळ, हिंदी आणि बंगालीतही लोकप्रिय होते. विशेषत: तामिळीमध्ये तर अतिशय लोकप्रिय होते. शाब्दिक कोट्यांचा मोहकपणा भापांत रात फारसा टिकत नसतो. तरी खांडेकर प्रिय होते. वेळोवेळी मराठीतील कादवन्यांचे अनुवाद भारतीय भाषांमधन झाले पण एकही मराठी लेखक खांडेकरांइतका महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय ठरू शकला नाही. ज्यांच्या लिखणातील कलात्मकतेचे गोडवे आपण गातो ती माणसे मराठीत वेताचा वाचक वर्ग आकृष्ट करतात. महाराष्ट्राबाहेर इतकेही यश त्यांना मिळत नाही. या घटनेचा विचार मराठी समीक्षकांनी गंभीरपणे कधी केलाच नाही. कदाचित असेही अमेल की अमा विचार करणे सोयीचे नव्हते.

 वाङमयाच्या जगात अधूनमधून पण सातत्याने घडणारी एक घटना आपण समजून घेतली पाहिजे. काही लेखक असे असतात की त्यांचे युग अगदी उघडे, डोळ्यांत भरण्याजोगे असते. अगदी प्रथमदर्शनी सुद्धा हे गण जाणवतात. पण एखादा असा दोप असतो की जो सहजासहजी दिसत नाही आणि सहज न दिसणारा हा दोष असा प्रबल असतो की तो गुणांचे पोतेरे करून टाकतो. एवढी गणसंपदा असणारा लेखक पुढे टिकत नाही. अशा लेखकांची उदाहरणे देण्याची इथे गरज नाही. कारण खांडेकर या गटातले नव्हते. काही लेखक ह्यापेक्षा अगदी विरुद्ध असतात. त्यांचे दोपच ठळक, उघड आणि डोळ्यांत

ओळख