पान:ओळख (Olakh).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संत शब्दाचे संतीण हे रूप अजन लोकभाषेत रुढ आहे. मी या ठिकाणी उपासकाच्या मेळाव्यात देवता आल्या आणि देवतांचा संचार उपासकांच्या शरीरात झाला असा अर्थ करतो. पुढे एके ठिकाणी पृष्ठ ३५ वर "आता मोहनमाळ उराला" असा उल्लेख आहे. माझ्या मते या ठिकाणी " उते मोहनमाळ उराला" हा शुद्ध पाठ आहे. पण हे मतभेद शब्दांवरचे झाले. ते नेहमीच शब्दापुरते राहात नाहीत ‘परी' ही कल्पना मला भारतीय वाटत नाही. 'असरा', 'अप्सरा', 'यक्षिणी', 'जखिणी' भारतीय आहेत. 'परी' ही कल्पना युरोपीय आहे. भारतीय लोकसाहित्यात परीला गेली शंभर वर्षे सोडली तर जागा नाही असे मला वाटते. पृष्ठ १३७ वर दृष्टबाधा टाळण्यासाठी रामरक्षा म्हणून अगारा लावण्याचा उल्लेख आहे. मला ही पद्धत अर्वाचीन शिष्टांची वाटते. एके ठिकाणी मांडे म्हणतात, ब्राह्मणातील सर्वशाखा आजदेख'ल शिवाची उपासना करीत नाहीत. माझ्या मते हा उल्लेख चकीचा आहे. शिवशंकर ही मळ वैदिकांची देवता नव्हे, इतकेच यातील सत्य आहे. आज वैष्णवसुद्धा शंकराची देव म्हणन पूजा करतात. प्रश्न शिवाची पूजा करण्याचा अगर न करण्याचा नसून मोक्ष देणारी सर्वश्रेष्ठ देवता कोणती, इतकाच प्रश्न आता बाकी आहे. अशा प्रकारचे विविध पातळीवर मतभेद दाखवता येणे कठीण नाही. असे मतभेद असतात पण त्यामुळे मूळ विवेचनाचे महत्त्व कमी होत नाही.

 या विवेचनातील माझ्या मते, खरे महत्त्वाचे मुद्दे तीन आहेत. पहिला महा हा लोकसाहित्याचा विचार म्हणजे समाज जीवनाच्या संदर्भात मलतः निर्माण झालेल्या साहित्याचा विचार आहे. मग आज हा सांधा परंपरेत शिल्लक उरलेला असो अगर नसो. यातूनच निष्पन्न होणारा दुसरा मद्दा हा की परंपरागत लोकमानस ज्या ज्या रूपात व्यक्त होईल ती सर्व साधने समच्चयाने अभ्यासिली पाहिजेत. केवळ शब्दबद्ध वाङमयाचा अभ्यास अपुरा आहे. आणि तिसरा मद्दा असा की विधींच्या संदर्भात चालू कल्पनेने प्रभावित झालेल्या मनाचे अवशेष लोकसाहित्यात विविध रूपाने आढळतात. हे तीनही मुद्दे मला स्वतःला पटतात. ते भरपूर पुराव्याने आणि तपशिलाने मांडन डॉ. मांडे यांनी लोकसाहित्याच्या विवेचनात एक महत्त्वाची भर घातलली आहे. हे तीन प्रमुख मद्दे ज्याप्रमाणात अबाधित राहतील त्याप्रमाणात या पुस्तकाचे महत्त्व आहे. आणि हे मद्दे अबाधित राहतील असे मला वाटते. उरलेले मतभेदाचे मुद्दे तुलनेने दुय्यम असतात. या विषयाच्या अभ्यासकांनाही मांडे यांनी घातलेली भर अशीच महत्त्वाची वाटेल अशी अपेक आहे

१३९

ओळख