पान:ओळख (Olakh).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वा. ल. कुलकर्णी यांच्या विवेचनाशी असे अजून काही मतभेद दाखविता येतील. पण हे मतभेद दाखविल्यामळे खाडिलकरांचे इतके निर्दोष वाङमयीन मूल्यमापन प्रथमच उपलब्ध होत आहे, या विधानाला बाधा येण्याचे कारण नाही. मराठी नाटककारांचे विवेचन करणारे ग्रंथ पुष्कळ आहेत. पण ख-याखुन्या वाङमयीन रसग्रहणाचा योग अजून इतर नाटककारांना आलेला नाही. अनाग्रही, मनमोकळी, मार्मिक आणि कलाकृतीच्या प्रकृतीचे रहस्य सतत हुडकणारी टीका हे वा. लं. चे कायम वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हेच एक ठिकाण पकडून त्यांना धन्यवाद देण्याचा औपचारिकपणा करण्याची गरज नाही असे वाटते.

१३०

ओळख