पान:ओळख (Olakh).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कीय पारितोषिक समितीकडे जेव्हा ती विचारार्थ आली त्यावेळी कुणी फारसी चर्चा केली नाही, खळखळही केली नाही. मी त्या समितीचा सभासद होतो. मराठीतील एका समीक्षकाने ह्या वर्षीची सर्वांत चांगली कादंबरी म्हणून ययातीचे नाव सुचविले व मी अनुमोदन दिले. सर्वांनी एकमताने ही सूचना उचलून धरली. ज्यांनी नेहमीच खांडेकरांच्या वाङमयाचा कृत्रिम म्हणून अधिक्षेप केला, त्याच मंडळींनी त्या वर्षीची सर्वात चांगली कादंबरी ययाती ठरविली व ह्या कादंबरीला शासनाचे पारितोषिक मिळाले. काही वर्षानंतर मराठीतील सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून तिला साहित्य अॅकॅडमीचे पारितोषिकही मिळाले. केंद्र शासनाची पारितोषिके मिळविणारे खांडेकरांच्या पिढीत तेच एकटे कादंबरीकार आहेत. उरलेले दोन कादंबरीकार पेंडसे व रणजीत देसाई नंतरच्या पिढीतील आहेत.
 खांडेकरांच्या ययातीने मराठीतील कादंबरी वाङमयाच्या खपाचे सर्व उच्चांक पूर्वीच. मोडलेले आहेत. महाय द्धोत्तर काळातील एकही कादंबरी हा खूप मिळवू शकलेली नाही. पूर्वीच्या कादंबरीतसुद्धा शामची आई सोडल्यास हा खप इतर कादंबन्यांना क्वचितच मिळाला. पण भाऊसाहेब लोकप्रिय होतेच. खप हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मराठीतील अनेक युगप्रवर्तक कादंबऱ्यांपेक्षा अमृतवेल सुद्धा जास्त खपलेली आहे. खरा मुद्दा समीक्षकांच्या मान्यतेचा आहे. भारतीय ज्ञानपीठाची सुद्धा पारितोषिकासाठी पुस्तक निवडण्याची एक पद्धत आहे. आणि ही पद्धत एखाद्या लेखकाच्या लोकप्रियतेचा आदमास घेण्यापेक्षा निराळी आहे. Vञानपीठ समिती एकेका भाषेच्या अनेक जाणत्या विद्वानांना तुमच्या भाषेतील असामान्य महत्त्वाची कलाकृती सुचवा अशी विनंती करते आणि सूचना मागवते. म्हणजे एकेका भाषेची जी पुस्तके असामान्य म्हणून तज्ञ सुचवितात, त्यांच्यातून पारितोषिकासाठी निवड होते प्रथम ह्या वर्षीची सर्वात चांगली कादंबरी म्हणून! नंतर तीन वर्षांतील सर्वश्रेष्ठ मराठी पुस्तक म्हणन ! आणि आता गेल्या १०, वर्षातील असामान्य कलाकृती म्हणन ! जाणत्या समीक्षकांनी ययाती सुचविलेली आहे. ज्ञानपीठ एका भाषेतील तज्ञांना विचारून पुस्तकांची यादी करते. नंतर सर्व भाषांच्या तज्ञांकडन मते मागविते. अनेक भाषांमधील जाणत्या समीक्षकांची मान्यता म्हणजे भारतीय ज्ञानपीठाचे पारितोषिक ! ज्यांचे वाङमय वर्षानुवर्षे आपण कृत्रिम मानले, त्यांचीच कादंबरी सुचविण्याची पाळी विद्वानांवर यावी व मराठीतील हीच एक कादंबरी भारतीय समीक्षकांनी मान्य करावी हा योग म्हणजे काळाने मराठी समीक्षकांवर एकप्रकारे उगविलेला सूडच आहे. धक्का बसणारी बाब समीक्षकांची ही मान्यता पावली पाहिजे.

 प्राय: मराठ समीक्षक स्वतःला काहीच प्रश्न विचारीत नाहीत. असा एकदा धक्का बमला म्हणजे ही मंडळी क्षणभर गवरल्यासारखी होतात पण

ओळख ५