पान:ओळख (Olakh).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'विकास दाखवावा लागतो. यांतून विचारनाटय उगम पावत असते. राम-राव‘णांनी परस्परांविरुद्ध उभे राहावे आणि दोघांच्याही तलवारीचा खणख‘णाट ऐक यावा हा संघर्ष असला तरी ते विचारनाटय नव्हे. त्याप्रमाणेच भीम आणि जरासंध यांनी परस्परांचा धिक्कार करणारी व्याख्याने द्यावीत हेही विचारनाटय नव्हे. या पद्धतीने आपण पाहू लागलो म्हणजे खाडिलकरांच्या नाटकात जे आहे त्याचे स्वरूप विचारनाटयाचे नव्हे ही गोष्ट दिसून येते.
  खाडिलकरांनी आपल्या नाटकांत खलपुरुषांनाच विनोद निर्मितीसाठी राबविलेले आहे. खलपुरुषांचा असा वापर विनोदाचीही हानी करतो, खलपुरुष कोसळतातच. खलनायक कोसळत असल्यामुळे नाटयाचीही हानी करतो. गडकन्यांच्या नाटकात विनोदासाठी निष्कारणची पात्रे असतील पण त्यांनी खलपुरुषावर विदूषक होण्याची जबाबदारी टाकलेली नव्हती. खाडिलकरांनी ही पद्धत कोल्हटकरांपासून उचलली आहे असे मला वाटते. ज्या ठिकाणी खाडिलकर या भानगडीत पडत नाहीत आणि सरळ द्रौपदीच्या विरोधी कीचक उभा करतात आणि कीचकालाही एक तात्त्विक संगतो व अविष्ठान देतात त्या ठिकाणी खाडिलकरांची प्रतिभा मोठ्या वैभवात असताना दिसते. जिथे असे तात्त्विक अधिष्ठान खाडिलकरांना पुरविता येत नाही तिथे खाडिलकरांचे नाटक कोसळू लागते. खाडिलकरांचे नाटक हे व्यक्तीचे नाटकच नव्हे. ते प्रतिनिधीचे नाटक आहे. कीचक जेत्यांच्या अहंभावाचा प्रतिनिधी व्हावा, द्रौपदीत जितांचा स्वाभिमान उसळून यावा, धर्माने तडजोडवादी व्हावे, विराट, सुदेष्णा, रत्नप्रभा यांचेही नमुने (Types) व्हावेत म्हणजे खाडिलकरांचे नाटक वहरून येते. खाडिलकरांची नाटके हा शब्द उच्चारताच त्यांची प्रभावी पात्रसष्टी डोळ्यांसमोर येते ही गोष्ट खरी पण ही पात्रे व्यक्ती म्हणून जिवंत होत नाहीत, नमना म्हणून प्रकाशमान होतात ही दुसरी गोष्ट खरी आहे.

 खाडिलकरांचे मूल्यमापन करताना अजून काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्यातील एक म्हणजे नाट्याभ्यासाकडे ( Melodrama कडे ) आरंभापासून त्यांच्या मनाचा एक कल होता. 'कीचक वध', 'भाऊबंदकी' लिहितानाच ' बायकांचे बंड' त्यांनी लिहून टाकले. ' मानापमान' लिहिण्याच्या आधी प्रेमध्वज ' ही त्यांनी लिहून पाहिला, जणू 'बायकांचे बंड' आणि 'प्रेमध्वज ह्या नाटकांमधून खाडिलकर 'मानापमान' ची पूर्वतयारी करीत होते. 'मानापमान ' लिहीपावेतो संगीत नाटकाकडे खाडिलकरांचे लक्ष गेले नव्हते. ही माहिती देतानाच आरंभापासूनच खाडिलकर एकीकडे 'किचकवध', 'बायकांचे बंड' लिहिण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाबही आपण नोंदविली

१२८

ओळख