पान:ओळख (Olakh).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वभावरेखन डागाळून टाकलेले आहे. खाडिलकरांची व्यक्तिरेखा म्हणजे एकेका भमिकेचा प्रतिनिधी असणारा नमुना असतो. त्यांच्या रामशास्त्र्यांना मानाचा प्राण धोक्यात घालण्याच्या आधी कधी भीती वाटतच नाही. त्यांच्या दौपदीला धर्माची चीड येते पण धर्माची संमती न घेता एखादी गोष्ट करून जावी असा विचार तिच्या मनात उगवतसुद्धा नाही. आणि पत्नीची बेअब्रू थंडपणे पाहणाऱ्या धर्मालाही पती म्हणून निभावून न्यावे लागावे याचा विषादही त्यांच्या द्रौपदीला कधी वाटत नाही. ही माणसे खाजगी बोलोत अथवा जाहीर. तो व्याख्याने दिल्यासारखीच बोलतात. आणि मैदानी वक्ते ज्याप्रमाणे टाळीचे वाक्य वेळ साधून उच्चारतात त्याप्रमाणे ही पात्रेही टाळीची वाक्ये बोलतात. खाडिलकरांच्या नाटकातील पात्रांचे स्वरूप असे एकसुरी, एकपदरी आहे. पण या पात्रांना व्यक्तिमत्व यावे यासाठी लागणारा सघनपणा त्यांना कुठेच नीटसा हेरता येत नाही. 'स्वयंवरातील' रुक्मिणो, 'भाऊबंदकी' तील राघोबा यांसारख्या पानांच्या मनात थोडाफार मानसिक संघर्ष चालल्याचे दिसते हीच त्यातल्या त्यात सुखाची जागा. मानसिक कल्लोळांना, उत्कट दुःखांना, भावनांच्या हळवारपणाला खाडिलकरांची नाटयसष्टी मोठया प्रमाणात पारखी आहे. 'माझे प्रेम मत्यसकट तिकडच्या चरणांचा स्वीकार करत आहे.' या भाषेतच खाडिलकरांची माणसे बोलतात. ज्या मार्गात शील नाही, ऐश्वर्य नाही, पराक्रम नाही, विजय नाही, सुख नाही, धर्म नाही त्या मार्गाने मला जावयास का लावता ?' हे व्याख्यानवजा वाक्य जोरकम मानावयाचे आणि 'मरणाचा मुहूर्त साधून रायगडचा हा राजा मृत्यूच्या विळख्यात...' अशा प्रकारच्या भाषेत गडक-यांची पात्रे वोल लागली, 'पतिव्रतेला नाती नसतात. ती . पित्याची कन्या नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते, असे सिंधने म्हटले की ते मात्र कृत्रिम म्हणायचे, नाटकी म्हणायचे. ही मीमांसा पटणे फार कठीण आहे. खाडिलकर आणि गडकरी दोघांच्याही नाटकांत कान दिपवणारी, मनाला गंगी आणणारी ठसकेबाज भाषाशैली आहे. दोघांची पद्धत निराळी असेल पण नाटकीपणा, भडकपणा, आक्रस्ताळ पणा दोन्ही ठिकाणी सारखाच आहे.

 विचार नाटयाचा उगम ठरीव भूमिकेतून भाषणे करणान्या पात्रांच्या व्याख्यानातून होत नसतो. चिंतनशील व्यक्तिमत्त्व असणान्या व्यक्तींच्या स्वभावरखंमधून विचारनाटयाचा उगम होत असतो. चितनशील पात्रांनी भरलेली नाट्यसष्टी उभी करण्यासाठी तेवढेच भरीव स्वभावरेखन करावे लागते. मनाची आंदोलने रंगवावी लागतात, जीवनाची संगती लावण्याची धडपड आणि या धडपडीतून होणान्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वयंभू आणि स्वाभाविक

१२७

ओळख