पान:ओळख (Olakh).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटकात येणे ही गोष्ट नाट्याला उपकारक ठरली नसून मारक ठरली आहे. हीच गोष्ट 'भाऊबंदकी' बाबतसुद्धा म्हणता येईल. या नाटकात न्यायनिष्ठूर रामशास्त्र्यांनी राघोबाला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा फर्मावणे या घटनेला म्हाळसा आणि दुर्गा यांच्या ओढाओढीत योगायोगाने रामशास्त्र्यांच्या हाती हुकूमनामा पडणे या योगायोगाचाच आधार आहे. हा सगळा योगायोग रामशास्त्र्यांची उंची वाढवीत नाही, कमी करून टाकतो. किंबहुना या नाटकाचे अधिष्ठानच नाहीसे करून टाकतो. खाडिलकरांच्या तीन महत्त्वाच्या ऐतिहासिक नाटकांवरील वा. लं. च्या आक्षेपाचे स्वरूप हे असे आहे. शेवटी नाटककार म्हणन खाडिलकरांचे मोठेपण 'मानापमान', 'स्वयंवर', 'भाऊबंदकी', 'कीचकवध' या जास्तीत जास्त यशस्वी नाटकांवरूनच आपण करणार. पण ज्या ठिकाणी खाडिलकरांना जास्तीत जास्त यश आले आहे त्याही ठिकाणी त्यांच्या मर्यादा चटकन आपणास दिसू लागतात.

 वा. लं. नी केलेले खाडिलकरांच्या विविध नाटकांचे मूल्यमापन हे जवळ जवळ मला मान्यच आहे. आणि म्हणून ते मला अत्यंत रसिक व मार्मिक वाटते. पण ज्या ठिकाणी एकण खाडिलकरांविषयी वा. लं मते देऊ लागतात त्या ठिकाणी माझा मतभेद आहे. गडकन्यांविषयी त्यांच्या मनात एक प्रकारचा राग कुठेतरी आहे ही जाणीव 'खाडिलकर' वाचतानाही सारखी होत राहाते. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर आणि गडकरी या चौघांनाही फार मोठ्या मर्यादा होत्या. या मर्यादा एकूण मराठी नाट्यवाङमयाच्याच मर्यादा आहेत ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. पण प्रत्येकाची काही सामर्थ्य स्थाने आहेत. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांची सामर्थ्यस्थाने लक्षात घेऊन त्यांच्या मर्यादा वा. ल. विसरतात आणि गडकन्यांच्या मर्यादाच लक्षात घेऊन ते सामर्थ्य स्थाने विसरतात, अशी त्यांच्याविषयी माझी तक्रार आहे. वा. ल. म्हणतात, गडकन्यांच्या नाटकांनी श्रीपाद कृष्णांचे लेखन अगदी निस्तेज करून टाकले. पण त्यांची नाटके खाडिलकरांच्या नाटकांना मात्र निस्तेज करू शकली नाहीत. वा. लं. ची ही भूमिका मराठी रंगभ मीच्या इतिहासात वसणारी नाही. खाडिलकरांचे पहिले महत्त्वाचे नाटक 'कीचक वध' रंगभूमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकरांचे 'वीरतनय' आणि 'मकनायक' रंगभूमीवर येऊन गलेले होते. कोल्हटकरांच्या सर्व आकर्षकतेचे स्वरूप ' नावीन्य' इतकेच होते. त्यांनी दिलेल्या चाली, त्यांची स्वतंत्र कथानके, त्यात विनोदासाठी राखन ठेवलेली जागा, त्यांनी उडवलेले नटीसत्रीधाराचे प्रवेश, या नवेपणामळे कोल्हटकरांना अल्पजीवी लोकप्रियता मिळालेली होती. पण गडकरी आपल्या वैभवाने रंगभमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकर निस्तेज झाले होते. कोल्हटकरांची नाटके गडक-यांमुळे मागे पडली नाहीत; ती त्यापूर्वीच मागे पडलेली होती. ऐन लोकप्रियतेच्या काळातही 'सौभद्रा'ची लोक

१२४

ओळख