पान:ओळख (Olakh).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्यतेच्या सर्व सीमा गुंडाळून ठेवणारा एक सुखद नाटयाभास आहे. स्वेच्छेने बुद्धीला आणलेल्या अर्धवट गुंगीत पाहावयाचे हे नाटक आहे. ज्याप्रमाणे परिकथा वाचताना डोंगरांना पंख असू शकतात; ससे मानवी भाषेत बोल शक- . तात हे माणसाला गृहीत धरूनच चालावे लागते तसे 'मानापमाना' चे आहे. या नाटकाची एकूण प्रकृतीच हलक्या फुलक्या सुखद नाटयाभासाची आहे. ज्यामुळे स्थूलपणा, नाटकीपणा, अस्वाभाविकपणा हे सगळेच या ठिकाणी गुण होऊन येतात. या नाटकातील काव्य, संभाषणातील कल्पनाविलास या सा-यांचे स्वरूप बेगडी आणि उथळ आहे. पण हा बेगडीपणाच या ठिकाणी गुण ठरतो. उलट खरी भावनाप्रधानता या नाटकात दोषरूपच ठरली असती. नाटयाची प्रकृती लक्षात घेऊन मानापमाना' चे केलेले विवेचन इतके मामिक व त्या नाट्याच्या रहस्याचा अचूक शोध घेण्याचे विवेचन हे मराठीत पहिलेच आहे.

 'मानापमान' च्या अगदी उलट प्रकार स्वयंवर नाटकाचा घडलेला आहे. ' स्वयंवर ' नाटकाकडे बालगंधर्वाच्या प्रमख भमिकेभोवती उभे केलेले एक संगीतप्रधान नाटक म्हणूनच पाहण्याची सवय प्रत्येकाला आहे 'स्वयंवर' म्हटले की रुक्मिणीचा 'दादा ते आले' हा रंगभ मिवर होणारा प्रवेश, ' खडा मारायचाच झाला तर' या प्रवेशातील स्वप्नाळ शंगार, यांची आठवण सदैव होत राहाते. प्रयोगाच्या रंगतदारपणामुळे या नाटकातील गंभीर नाटयाकडे सर्वांचेच पार दुर्लक्ष झालेले होते. 'मानापमान' कडे गंभीर नाटक म्हणून पाहणे ही पहिली चक आणि 'स्वयंवराकडे ' संगीताची मेजवानी म्हणन पाहणे, लडिवाळ शंगाराने ओथंबलेले नाटक म्हणून पाहणे ही दुसरी चूक. अशा दोन्ही चका मराठीत झालेल्या आहेत. मला असे वाटते की स्वयंवराकडे पाहण्याची सगळी दिशाच चकली याचे कारण 'सौभद्र' हे नाटक आहे. 'सौभद्र' च्या संदर्भातच स्वयंवराकडे पाहण्याची सवय प्रायोगिक रंगभूमीमुळे व प्रयोगामळे लागली. त्यामुळे या नाट्यातील रुक्मिणीचे विविध पातळीवरचे स्वभावरेखन, तितकेच प्रभावी अशी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा याकडे समकालीन टीकाकारांचे लक्षच जाऊ शकले नाही. पुराणात असणारी व प्राचीन मराठी कवींनी रंगविलेली रुक्मिणी-स्वयंवराची कथा आणि खाडिलकरांच्या 'स्वयंवर' नाटकातील नाटय यांचे स्वरूप परस्परांपेक्षा अगदी भिन्न आहे. प्रेमविव्हल झालेल्या रुक्मिणीची पत्रिका वाचन तिच्या स्वीकाराला तयार होणारा कृष्ण वेगळा आणि कंसवधापासून सुरू झालेल्या धर्माची स्थापना, चिरस्थायी करण्याकरिता मला स्वयंवराला आमंत्रणाविना येणे भाग पडले असे म्हणणारा कृष्ण अगदी निराळा आहे. खाडिलकरांचा कृष्णाला धर्म आणि अधर्म यांच्यामधील संघर्षाचा निर्णय रणभमीवर करून

१२०

ओळख