पान:ओळख (Olakh).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कधी त्रास झालेला दिसत नाही फडके लोकप्रियच राहिले पण खांडेकर पेक्षा सर्वार्थाने निराळे असून सुद्धा लोकप्रिय ठरले. लोकप्रिय कादबरीकाराची लोकप्रियता व प्रतिष्ठित कादंबरीकाराची प्रतिष्ठा त्यांचा कोणताही उपसर्ग खांडेकरांना झालेला दिसत नाही. पुढे समीक्षक म्हण लागले, खांडेकर संपले जने झाले. आता त्यांच्यात काही अर्थ उरला नाही आणि हा लेखक खपतच होता. त्याचा वाचकवर्ग टिकूनच होता. युगप्रवर्तक लेखक आले आणि इतिहास जमा झाले. खांडेकर आपले टिकूनच ! आपल्या नेहमीच्या गणिताप्रमाणे, सांगायचे तर १९४५ सालापूर्वीच्या लेखकांत खांडेकरांची गणना करायला हवी. प्रत्यक्षात त्यांची 'ययाती' सारखी श्रेष्ठ कादंबरी त्यांचे युग संपून एक तप उलटल्यावर आली
 एका दष्टीने खांडेकर मोठे सूदैवी कादंबरीकार म्हटले पाहिजेत. फडके, खांडेकर व माडखोलकर ही त्रयी मराठी वाङमयात मानली जाते. ह्या तिघांतसुद्धा वेळ येते त्या त्या वेळी कलात्मक गणक्रमांक लावताना समीक्षक फडके, माडखोलकर, खांडेकर असा लावतात. पण इ. स. १९४५ नंतरच्या काळात विशेषत: १९५० ला नववाङमय स्थिरावले, ह्या नंतरच्या काळात फडके व माडखोलकरांना मराठी समीक्षकांना अस्वस्थ करील, मराठी वाचकांना वेभान करील असे काही लिहिता आलेले नाही. समीक्षकांना हे संपले असे म्हणावे व वाचकांनी तो कौल खोटा पाडावा हा योग त्या त्रयींत फक्त खांडेकरांना आला. काळाने एका अर्थी मराठी समीक्षकांवर फार मोठा सूड उगविलेला आहे असेच म्हटले पाहिजे.
खांडेकरांना जीवनात नानाविध सन्मान मिळाले हा अगदी निराळा महा आहे. आम्ही मंडळींनी  मराठी वाङमयाची सेवा नावाचा एक ऐसपैस प्रकार गहीत धरलेला आहे. खांडेकरांच्या सर्व वाङमयावर खोटेपणाचा कायमचा छाप उठवन सुद्धा आपण असे म्हणू शकतो की त्यांनी केलेली मराठी सरस्वतीची सेवा फार महत्त्वाची आहे. खांडेकर चांगले कादंबरीकार, टीकाकार नाहीत पण त्यांची वाङमय सेवा महत्त्वाची आहे. नेमक्या ह्या आवरणाखाली अनेक बाबी खपतात. ते साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष होवोत, त्यांना पद्मभूषण मिळो, त्यांनाच एकटयाला साहित्य अॅकॅडमीची फेलोशिप मिळाली. ह्या साया मान-सन्मानाला हे आवरण बरे आहे.
 भारतीय ज्ञानपीठाने केलेला सन्मान हा या प्रकारचा नाही. ह्या सन्मा

अनेकांना धक्का देणारा असा हा प्रकार आहे. ज्यावेळी ययाती प्रकाशित झाली, त्यावेळी तिच्यावर बरीवाईट चर्चा झालीच पण शास.

ओळख