पान:ओळख (Olakh).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्ट मला स्वतःला फार आवडली. एकीकडे ' सत्त्वपरीक्षा' आणि 'सावित्री' या नाटकांतील अत्यंत रसभंगकारक व कलाहीन विनोद, दुसरीकडे 'भाऊबंदकी' तील मूळ नाट्याला नवे परिमाण देणारा अगर ' मानापमान' मधील सर्व नटयाभासाला व्यापणारा खाडिलकरांचा विनोद यांना एका दावणीत बांधून वाङमयीन रहस्याचा शोध फारसा लागण्याची शक्यता नव्हती. एकेक कलाकृती समग्र म्हणून पाहणे व कलाकृती म्हणून तिच्याविषयी प्रतिक्रिया नोंदविणे ह्या मार्गानेच खाडिलकरांच्या वाङमयाचा अभ्यास अधिक मर्मग्राही होऊ शकतो. वा.लं. नी त्यांच्या उपजत मार्मिकपणाने व रसिकतेने हे हेरले आहे. कथानकाचे सारांश, कथानकाची प्रवेशवार मांडणी प्रत्येक कथानकातील कच्चे पक्के दवे यासारख्या प्रश्नांची चर्चा वा. ल. करीत बसत नाहीत. एक कलाकृती म्हणून त्या नाटकाविषयी आपल्या प्रतिक्रिया नोंदवन त्यांनी जितके यशस्वी वाङमयीन मुल्यमापन केले आहे तितके यश एकाही मराठी नाटककाराच्या आजवर झालेल्या मल्यमापनाला आलेले नाही ही गोष्ट मान्य केली पाहिजे. मराठीत नाटककारांची मूल्यमापने करणारी पुस्तके थोडी नाहीत. या पुर वा. लं. च्या ' खाडिलकरां' ची तुलना आपण करू लागलो म्हणजे या जागी फरक जाणवतोच. हा फरक प्रामुख्याने निकोप वाङमयीन दृष्टी आणि अस्सल रसिकता यांमुळे पडलेला आहे. पण या फरकाला विवेचन पद्धतीही उपकारक झाली आहे.

 एखाद्या लेखकाचा अभ्यास करीत असताना ज्या वातावरणात आणि ज्या संदर्भात तो लेखक उभा राहिला ते वातावरण व तो संदर्भ ध्यानात घेणे महत्त्वाचे असते. ही माहिती म्हणजे वाङमयीन मूल्यमापन नव्हे, ही गोष्ट जितकी खरी तितकीच या माहितीशिवाय वाङमयीन आकलन शक्य नसते ही दुसरी गोष्टसुद्धा खरी आहे. याची जाणीव वा. लं. नी सतत बाळगली आहे. टीकाकार वा. ल. कुळकर्णी ' ह्या लेखात मी यापूर्वीच त्यांच्या अशा परिशिष्टांचे महत्त्व नोंदविलेले आहे. त्या दृष्टीने त्या पुस्तकातील ' नाटककार खाडिलकरांचा काळ : मराठी नाटचसृष्टी' या परिशिष्टाकडे एकवार मी लक्ष वेध इच्छितो. या परिशिष्टात खाडिलकरांच्या अवतीभवती असणारी मराठी नाटयसष्टी, खाडिलकरांची नाटके आणि त्यांच्या जीवनचरित्रातील प्रमख घटना यांची संगती जळवन दिलेली आहे. हे सारेच काम वा. लं. नी नऊ पष्ठात आटोपलेले आहे. सामान्यत्वे आमचे लेखक चरित्र रेषेच्या निमित्ताने व खाडिल. करपूर्व रंगभूमी, त्यांच्या समकालीन असलेली रंगभूमी; समजावून सांगण्याच्या निमित्ताने या दहा पानांतील मजकर सांगण्यासाठी पाऊणशे पाने सहजच खातात व रेखीवपणे काहीच सांगत नाहीत असा अनुभव आहे. वा. लं. च्या

ओळख

११७