पान:ओळख (Olakh).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विसरता येणार नाही. वा. लं. च्या विवेचनात अशी गल्लत कोठेही झालेली नाही. प्रयोगाविषयी अधूनमधून माहिती देणे, त्यांना कठीण होते असे नव्हे, तर आपण वाङमयीन मूल्यमापनाला बसलो आहोत. या त्यांच्या भूमिकेवरची त्यांची पकड पक्की असल्यामळेच त्यांनी हे कटाक्षाने टाळले आहे आणि हे असे झाले आहे हेच योग्य आहे.
 खाडिलकरांच्या मूल्यमापनाला अडथळा करणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाटकांना असणारा वर्तमानकालीन राजकारणाचा सदर्भ होय. 'कीचक वध' या नाटकाचे विवेचन सुरू झाले की तत्कालीन राजकारणात जहाल आणि मवाळ हे गट कसे होते, त्यांचे पडसाद या नाटकावर कसे उमटले आहेत, 'कीचक' पाहत असताना त्यावेळच्या प्रेक्षकांना कर्झन कसा दिसत असे, हे विवेचन सुरू होते. 'भाऊबंदकी' च्या विवेचनात सुरत काँग्रेस व त्यात झालेले भांडण या विषयीचे विवेचन, 'विद्याहरण' मदिरापान, त्याचे विरोधी करण्यात आलेला प्रचार व या संदर्भात कोल्हटकरांचे 'मूकनायक' व गडक-यांचा 'एकच प्याला' ह्यांच्याशी उत्कृष्ट प्रचाराच्या दृष्टाने तुलना, असे अनेक फाटे खाडिलकरांवरच्या विवेचनाला फुटत असतात. एका समीक्षकाने तर त्या काळात प्रयोगांचे उत्पन्न किती होते याविषयीची आकडेवारोसुद्धा परिश्रमपूर्वक गोळा करून उध्दत केली आहे. या सर्व पसायात वाङमयीन मूल्यमापन जर लप्त झाले असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
 खाडिकरांच्या नाटकांचे मूल्यमापन करण्याची तिसरी तन्हा म्हणजे या नाटकांचे कथाकथन कसे वांधीव व चिरेबंद असते याचे विवेचन. खाडिलकर नाटक लिहीत असताना त्यात नटांच्या अभिनयासाठी कसा मोकळा वाव सोडीत याचेही मग विवेचन होई. एकीकडे ' स्वयंवरातील-' खडा मारायचा झाला तर' या प्रवेशाला बालगंधर्व हटकून टाळी कशी मिळवीत याची गहिवरलेली स्मती, दुसरीकडे खाडिलकर हे कसे राजकारणी द्रष्टे होते याविषयीचे विवेचन आणि तिसरीकडे त्यांच्या नाटकांची कादंबरीप्रमाणे कथानकदृष्टया केलेली पाहाणी, या त्रिकोणातील खाडिलकरांच्या नाटकांतील नाटय, या नाटकाचे वाङमयीन मल्य, या नाटकाचे सामर्थ्य मर्यादा, या नाटकाची प्रकृती, या बाबी कैद होऊन पडलेल्या होत्या. संपूर्ण खाडिलकरांच्या नाटकांचे वाङमयीन भमिकेवरून केलेले सविस्तर विवेचन वा. लं. च्या ग्रंथामळे प्रथमच उपलब्ध होत आहे हा या ग्रंथाचा एक महत्त्वाचा विशेष म्हणता येईल.

 हे मूल्यमापन करीत असताना खाडिलकरांची कथानके, खाडिलकरांचे नायक, खाडिलकरांचा विनोद, त्यांची शैली अशी चांगल्या व वाईट नाटकांना एका दावणीत बांधन चिरफाड करणारी मीमांसा वा. लं. नी केली नाही. ही

११६

ओळख