पान:ओळख (Olakh).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही गोष्ट जरी खरी असली तरी या लेखकांचा मोठेपणा किंवा महत्त्व सांगण्यासाठी मागचे पुढचे धागेदोरे धुंडाळावे लागत नाहीत. वामन मल्हार हे असे लेखक होते. स्वतः खाडिलकर हेही असेच नाटककार आहेत. मार्मिक रसिकतेच्या शोधात टीकाकाराला वामन मल्हार आणि खाडिलकर तपासताना जसा आनंद होतो. तसा आनंद कोल्हटकर तपासताना होण्याचा संभव कमी आणि म्हणन वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्या टीकाकाराचे लेखन खाडिलकरांची तपासणी करताना जसे यशस्वी झाल्यासारखे वाटत नाही म्हणनच खाडिलकर हा फार चांगला विषय वा. लं. ना मिळाला असे वर म्हटले आहे. हीच गोष्ट वा. लं. नी केलेल्या 'पण लक्षात कोण घेतो?' यासारख्या कलाकृतीच्या रसग्रहणाच्या वेळी आणि मक्तामालेसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या कादंबरीविवेचनाच्या वेळीही ध्यानात येते. जे ठिकाण वा. लं. च्या रसिकतेला आव्हान देत असते, आवाहन करीत असते तिथे वा. लं. ची सर्व सामर्थ्य उफाळून येतात.

 खाडिलकरांवर मराठीत कमी लिहिले गेले असे नाही. लेख सोडन दिले तरी यापूर्वी निदान तीन पुस्तके तरी खाडिलकरांवर लिहिली गेलेली आहेत. त्यातील एक तर फडके यांच्यासारख्या आपल्या काळात महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या टीकाकाराने लिहिलेले आहे. पण आजवरचे खाडिलकरांचे झालेले सर्व मूल्यमापन आपण पाहु लागलो म्हणजे त्यात विविध प्रकारची सरभेसळ आढळून येते. खाडिलकरांच्या नाटकाचे अतिशय रंगलेले प्रयोग त्या नाटकाच्या मूल्यमापनावर परिणाम करताना आढळतात. 'देवांना म्हातारपण येत नसते तशी मराठी रंगभूमीवरील काही चिरतरुण असणारी नाटके आहेत.' ज्यांत 'सौभद्र' आणि 'संशय कल्लोळ' यांच्या बरोबरीचा मान । मानापमान' चा आहे. हे मूल्यमापन मानापमानाच्या प्रयोगमूल्यांच्या दृष्टीने ठीक असले तरी कलाकृती म्हणन ह्या मूल्यमापनाला काही अर्थ नाही. कारण या मल्यमापनात गाण्याची माधुरी, गायक नट, नाटय संगीत आणि वाङमयीन मुल्य यांची सरभेसळ झालली आहे. ' स्वयंवर' नाटक एके काळी मराठी रंगभमीवर असेच गाजलेले नाटक होते. बालगंधर्व म्हातारे झाले आणि मन हे नाटकही मागे पडले. एखादा नट डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या नाटकाची गत ही अशीच व्हायची. हे मूल्यमापनही पुन्हा प्रयोग व वाङमयीन मूल्ये यांत घोटाळा करणारेच आहे. खरोखरी नाटकाचा प्रयोग, त्याची रंगत व तो प्रयोग यशस्वी ठरण्याची कारणे यांचा विचार आणि एक कलाकृती म्हणून नाटकाचा विचार, या दोन विचारांतील वर्तुळांचा काही प्रदेश एकत्र दिसत असला तरी, तो परस्परांत मिसळलेला असला तरी, या दोन वर्तुळांची दोन भिन्न केंद्रे आहेत हे

११५

ओळख