पान:ओळख (Olakh).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसेल तर आणि राहवत नसेल तर तरुण स्त्रीला तिने चोरून व्यभिचार करू . नये म्हणून पुनर्विवाहाची गौण पक्ष म्हणून परवानगी, अशी ही भूमिका आहे. फले, रानडे यांच्यानंतर शेजारी महर्षि कर्वे असताना एका सुधारकाचे हे विचार आहेत, हे विसरता येणार नाही. परंपरेने समाजव्यवस्थेत जे कनिष्ठ मानले गेले होते त्यांच्यात घटस्फोट व पुनर्विवाह रूढ होतेच. कोल्हटकर आपद्धर्म म्हणून वरिष्ठवर्गीय विधवांना क्षम्य सवलत म्हणून कनिष्ठ वर्गीय स्त्रियांच्या सवलती देत आहेत इतकाच याचा अर्थ होतो आणि अशी सवलत देताना आता तुम्ही अनुकरणीय राहिलेला नाहीत असेही बजावीत आहेत. बौद्धिक साहचर्य व प्रेमविलासासाठी गणिका सहवास अगदी स्वाभाविक समजणान्या पुरुषाचे स्त्री वर्गाविषयी हे मत आहे. आमच्या सुधारक वर्गाला सुधा. रणा हव्या होत्या हयात वाद नाही पण मनाने पुरोगामी किती होते व नाईलाजे आपल्या सनातनीपणात तडजोड करण्यास तयार झालेले किती होते याचा एकदा बारकाईने शोधच ध्यावा लागेल.
 कोल्हटकरांना धर्माबद्दल फारशी आस्था नाही. त्यांना भूतकाळाविषयी श्रद्धाही फारशी नाही. भविष्यकाळासाठी जिद्द नाही. ह्याकडे लक्ष वेधून करंदीकर म्हणतात, अशा समीक्षकाला वर्तमान व भूताचा उपहास व भविष्यासाठी अद्भत कल्पनाविलास ह्यापेक्षा अधिक काय करता येणार होते. तेवढे कोल्हटकरांनी केलेले आहे. हा निर्णय कठोर आहे. पण फारसा चुकला आहे असे म्हणायची सोय नाही. म्हातारपणी आयुष्याच्या अखेरीस कोल्हटकरांना असेही वाट लागले की, आपण जुन्या चालीरीतोवर फार मोठी टीका केली ती चक झाली. खरे म्हणजे हिंदू परंपरेच्या महत्त्वाच्या भागावर कोल्हटकरांची टीका फारशी जहाल नाही. त्यांचा आक्षेप समाजरचनेवर नसून काही चालीरीतींवर आहे. ज्या चालीरीतींची त्यांनी टर उडविली आहे त्या लोकप्रिय असल्या तरी धर्ममान्य होत्याच असे नाही. तरीही आपली चूक झाली असे त्यांना वाटते. माफक प्रश्नावर प्रथम माफक लिहायचे. आचारांची जबाबदारी घ्यायचीच नाही व जे माफक लिहिले तेही चुकले असे वाटायचे ही लक्षणे फार पुरोगामी नाहीत हे उघड आहे.

 कोल्हटकरांच्या वाङमयात स्वप्नाळूपणा व स्वप्नरंजन पुष्कळ आहे. त्यामुळे वास्तववादाचा फारसा प्रश्न नाहीच. त्यांच्या वाङमयात खरे असण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. तसा खरे वाटण्याचाही प्रश्न उपस्थित होत नाही. पण निदान वाङमयाच्या ह्या रूपाचे तात्विक समर्थन नसावे. पण तेही कोल्हटकर करतात. सौंदर्य आणि सद्गण ह्यांचे कल्पनासष्टीत इतके साहचर्य असते की कुरूप स्त्रीच्या अंगी सद्गुण असण्याची कल्पनाच आपल्याला सहन होत

११०

ओळख