पान:ओळख (Olakh).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दायाचे एक अग्रगण्य लेखक. त्यांच्या वैचारिक निष्ठा कोल्हटकरांपेक्षा किती तरी निराळचा, शैली निराळी, ललित वाङमयाचे स्वरूप निराळे. आपण जे जग पाहतो, जे अनुभवतो ते लिहितो असा माडखोलकरांचा दावा. मजजवळ फारशी कल्पकता नाही असे त्यांचे म्हणणे. कल्पकता हे कोल्हटकरी सांप्रदायाचे प्रमुख लक्षण. माडखोलकरांच्या लिखाणात विनोद किती आहे हेही तपासूनच पाहावे लागेल. एकेका सांप्रदायिकाचे दावेही मोठे विलक्षण आहेत. वरेरकर सांगतात, ' कोल्हटकरांनी कुणाचेही अनुकरण केलेले नाही. हेच अनुकरण मो केले' ह्यात मी कोल्हटकरांचे अनुकरण केलेले नाही इतका भाग तर सत्य आहे. फार तर आपण करदीकरांची मांडणी नापसंत करू व मनपसंत मांडणी सांगू. निष्कर्ष पुनः हाच येणार की कोल्हटकर संप्रदाय पुराव्याने सिद्ध करता येत नाही.
 कोल्हाटकरांचा प्रभाव सांगता येतो असे करंदीकर म्हणतात. त्यांनी त्याही प्रश्नाचा खूप सविस्तर विचार केलेला होता. करंदीकर असे मानतात की ललित वाङमयात साहित्यिकांच्या परस्परांवरील प्रभावाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. कोणत्याही भाषेतील मोठ्या लेखकांचे प्रभाव वाङमयजगावर पडतातच तो एक प्रश्न आहे. एखाद्या कालखंडात लोकप्रिय ठरलेल्या घटकांचे अन करण होते तो एक वेगळा प्रश्न आहे. आणि प्रतिष्ठित ठरलेल्या घटकांचा परिणाम व अनुकरण होते हा पुन: तिसरा प्रश्न आहे. त्या प्रभावामधून कधी कलात्मक जाणिवा अधिक डोळस होतात व वाङमयाची अंतरंगसमद्धी वाढते. कधी केवळ वहिरंगाचे नावीन्य वाढते. करंदीकरांनी असा हा प्रश्नांचा चौरस विचार केलेला होता व शेवटो निर्णय दिला होता की कोल्हटकरांचा मराठी वाङमयावरील प्रभाव प्रायः नावीन्य या नावाने ओळखल्या जाणा-या बहिरंग घटकांचा होता. ह्या प्रभावामुळे वाङ्मयीन जाणिवांचा फारसा भाग मद्रित प्रबंधात आलेला नाही.
 करंदीकरांच्या मद्रित प्रबंधाचे स्वरूप फार स्थल झालेले दिसते. त्यांची विचार करण्याची पद्धती, विश्लेषण व वर्गीकरण अशी कोल्हटकरांच्या जातकूळीचीच होती. छोटया छोटया वावींना पुरावे देत ते जात. ह्या आपल्या अभ्यासाचे संक्षिप्त रूप सादर करताना आपण किती स्थल होतो आहो ह्याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही. मनाचा विकलपणा म्हणायचा तो ह्यालाच. पण ह्याही अवस्थेत अतिशय मार्मिक अशी विधाने ह्या प्रबंधात जागोजागी विखुरलेली दिसतात ती नीट पाहून घेणे वाङमयाभ्यासकांना उपयोगी ठरेल.

 कोल्हटकरांचे एक विधान असे आहे, 'माझ्या संप्रदायाचे विशेष आरंभी कल्पना व विनोद होते' हे विधान कोल्हटकरांनी आपल्या उतारवयात व

१०८

ओळख