पान:ओळख (Olakh).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्रह्मास्वादासारखा असतो म्हणून ती अलौकिक आहे असे म्हणताना लौकिक जीवनातील इतिकर्तव्यतेला उपकारक म्हणूनच कलांच्या जवळ जात आहेत. अलौकिकवाद्यांना तरी जीवनाच्या इतिकर्तव्यतेचे प्रश्न बाजूला सारणे आवश्यक आहे का?
 जे सौंदर्य वस्तुनिष्ठ मानतात त्यांना कलावादी अगर जीवनवादी असणे अपरिहार्य आहे का? जे स्फूर्तीला महत्त्व देतील ते अलौकिकतावादी असे किंवा याच्या उलट आपण म्हणू शकतो का ? आस्वादव्यापारातून ज्या उस्फूर्त प्रतिक्रिया आपणाला उपलब्ध होतात. त्यांच्यातील परस्पर विरोधी कोटी आपण समोरासमोर मांडल्या तर एका बाजला येणान्या सर्व विधानांचा संबंध एका रुवाशी दाखवता यायला पाहिजे. अर असे घडले तर सौंदर्य, कला आदी कल्पना द्विध्रुवात्मक आहेत. ह्या भूमिकेला एक महत्त्व निर्माण होते. असे जोपयंत घडत नाही तोपर्यन्त आपल्याला इतकेच म्हणावे लागते की, आस्वाद व्यवहारातूत प्राप्त होणान्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात परस्पर विरोधी आशय असणान्या विधानांच्या रूपाने दिसतात. या परस्पर विरोधी विधानांना निश्चितपणे दोनच केंद्रे आहेत असे म्हणता येत नाही. पुष्कळ वेळा ही परस्पर विरोधी विधाने एकच विचारवंत एकाच वेळी आग्रहाने सांगतात. कारण ही विधाने परस्पर विरोधी आहेत म्हणूनच ती अधिक सुसंगत अर्थ सांगतात असेही त्याला म्हणायचे असते. प्रत्येक कलकृती अपूर्व असते. अशा अपूर्व कलाकृती मिळन वाङमयाची एक परंपरा निर्माण होते ही अशी भूमिका आहे. कलांचा अनुभव अलौकिक असतो; सर्व अलौकिक अनुभव मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत म्हणन कलांना जीवनसापेक्ष महत्त्व असते अशीही एक भूमिका असते. यावरून फार तर असे सिद्ध होईल की, कलात्मक व्यवहार अनेक परस्परविरोधी ताणांनी बनलेला संकीर्ण व्यवहार असतो. म्हणून त्यात परस्परविरोधी विधाने दिसतात पण यामुळे द्विरुवात्मकता सिद्ध होत नाही आणि कलांच्या बाबत अनेक परस्परविरोधी विचार लोकांच्या मनात वावरत आहेत हे तर सर्वाना गहीतच असते. ज्या प्रश्नाविषयी सर्वच जण एकसारखा आणि सुसंगत विचार करीत असतात तो चर्चचा प्रश्न असू शकत नाही. चांगली गोष्ट ही आहे की, कोणत्याच क्षेत्रात सर्व जण एकसारखा विचार करीत नाहीत.< br>

 कलावाद आणि जीवनवाद, लौकिकता आणि अलौकिकता या प्रश्नांकडे पाहण्यापूर्वी सौंदर्याची जाणीव समाजात कशी निर्माण होते हेच पाहणे भाग आहे. अलौकिकतावाद्यांनी जर कलांचा अनुभव लौकिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ असतो म्हणन अलौकिक असतो अशी भूमिका स्वीकारली तर दोन अनुभवांची श्रेष्ठकनिष्ठता ठरविणारे निकष लौकिक

ओळख

१०३