पान:ओळख (Olakh).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साम्य असणान्या असतात ही कल्पना स्वीकारता येत नाही. पण या ताकिक अडचणीपेक्षा महत्त्वाची अशी आस्वादजन्य आडचण आहे. कलाकृतीच्या आस्वाद व्यवहारात हा सततचा जाणवणारा एक भाग आहे की, कलात्मक व्यवहाराच्या शेजारी रंजनाचा एक व्यवहार आहे. आणि या रंजनव्यवहारातील आकृतींचा तोंडवळा नेहमी कलाकृतींसारखा दिसतो. अजून शेजारी एक प्रचाराचा व्यवहार आहे त्याचाही चेहरामोहरा कलाकृतीसारखा दिसतो. रंजन व्यवहारातल्या, सादश्याचा आभास निर्माण करणान्या आकृती आणि तशाच प्रचार-व्यवहारातल्या आकृती यांची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, एका कलाकृतीपेक्षा त्याच वर्गातील सभासद असणान्या इतर कलाकृती मात्र वेगळ्या दिसतात. आणि खरे म्हणजे रजन, बोधाचा जो पसारा, जो या वर्गाचा सभासद नाही तो या वर्गातील सभासदांशी जास्तीत जास्त कुलसाम्य असणारा सापडतो.
 या आपत्तीला एक तर कलाकृतींचा वर्गच मानायचा नाही हे असू शकते. म्हणजे कलात्मक व्यवहाराचे तात्त्विक विवेचन करण्याची शक्यताच संपली नाही तर दुसरे उत्तर कलाकृती या वर्गातील सभासदांचे कुलसाम्य न पाहता कलाकृतींचा आस्वादकांना जो प्रत्यय येतो त्या प्रत्ययातील समान रूपवैशिष्ट्यांच्या आधारे कलाकृती या वर्गाचे सभासद ठरवायचे स्वरूप तपासून उत्पन्न होणारी आहे. तिच्यातील अडचणी दूर सारायच्या असतील तर कलाकृतींची गणना आस्वाद व्यापाराच्या आधारे करणे भाग आहे. आणि आस्वादव्यापार हा कला आणि अ-कला यांच्यातील व्यवच्छेदाचा आधार मानल्यानंतर कुलसाम्याची कल्पना गौण मानणे भाग आहे.
 सर्व प्रकारांतील कलाकृतींचा आस्वाद तरी निर्णायकपणे एकसारखाच असतो असे म्हणता येईल काय ? सर्व कलाकृती एकच प्रत्यय देतात असे म्हणायचे नसून आस्वादव्यापारातील समान घटक ठरविता येतात इतकेच येथे म्हणायचे आहे. कोणत्यातरी भूमिकेच्या आधारे कलाकृतीचा वर्ग ठरवता आला पाहिजे. हे जर आवश्यक असेल तर, मग मलादर्श ठरविण्यासाठी सुद्धा कोणता तरी आधार लागेल. हा आधार व.लाकृतीनामक वस्तूत नसतो तर तो कलात्मक आस्वाद या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या प्रत्ययात असतो.  जगभर विविध क्षेत्रांतील विविध विचारवंतांनी कलांच्या संबंधी जे विवेचन केलेले आहे ते पाटणकर स्थूलमानाने लौकिकतावादी आणि अलौकिकतावादी या दोन गटांत विभागतात. यांपैकी अलौकिकतावादी विचारवंत हे कलेची स्वायत्तता मानणारे कलावादी विचारवंत आहेत. आणि लौकिकतावादी हे जीवनवादी आहेत. ही स्थल विभागणी डोळ्यांसमोर ठेवन
ओळख

१०१