पान:ओळख (Olakh).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व कलाकृतींच्या ठिकाणी समान सत्त्व आढळेल ही अपेक्षा करणेच चूक आहे. म्हणून समान सत्त्व, समान धर्म ह्यांच्या आधारे कलाकृती या कल्पनेची व्याख्या करता येत नाही. पाटणकरांचा हा मुद्दा जिथपर्यंत कलाकृतीचा संबंध आहे तिथपर्यंत बिनतोड म्हटला पाहिजे. पाटणकरांपूर्वी या मुद्दयाकडे आपल्या विवेचनाच्या ओघात अनेकांनी लक्ष वेधलेले होते. पण या मुद्याचा एक अर्थ हा आहे की, कलाकृती या घटनेच्या किंवा वस्तूच्या अभ्यासाच्या आधारे वस्तूचे पृथक्करण करून जे वस्तुनिष्ठ सौंदर्याची भूमिका मांडतात ते मूलतः अशक्य असणारा उद्योग करीत आहेत. समान धर्माच्या आधारे, समान तत्त्वाच्या आधारे कलाकृतींचा वर्ग कल्पिता येत नाही किंवा स्पष्टही करता येत नाही. हे नक्की झाल्यानंतर कुलसाम्याची कल्पना पुढे येते. एका कुळातल्या व्यक्ती सारख्या सारख्या दिसतात. 'अ' सारखा 'व' दिसतो, 'ब' सारखा 'क' दिसतो. अशा सारखेपणावर एखाद्या कुलाचे कुल म्हणून ओळखले जाणे अवलंबून असते. पण यामुळे त्या कुलातील सर्व सभासदांना समान असणारा एकच एक धर्म असेल असे समजण्याचे कारण नाही. या कुलामध्ये कुलसाम्यही महत्त्वाचे असते. आणि प्रत्येक सभासदाचा वेगळेपणही महत्त्वाचा असतो. या कल्पनेत एक अडचण अशी आहे की एकाशी मिळती जुळती दुसरी वस्तू दुसरीशी मिळती जुळती तिसरी वस्तू-असा शोध घेत आपण निघालो तर त्याला मर्यादा राहणार नाही. हे साम्य शोधीत शोधीत जगातल्या सर्वच वस्तू एका कुलात येतात, या निर्णयापर्यंत आपल्याला यावे लागेल. कलामीमांसेत जर हे घडले तर त्यामळे कलाकृती आणि अकलाकृती ह्यांच्यातील फरकच पुसला जातो. पाटणकरांना या धोक्याची जाणीव आहे म्हणून ते असे म्हणतात की, ही साम्याची कल्पना कुठपर्यंत ताणायची हा तारतम्याचा विचार आहे मूल्यदर्शनापासून एका मर्यादेपर्यंतचा फरक आपण मान्य करू शकतो. त्याहून अंतर अधिक असले तर कल निराळे मानावे लागेल.

 मला स्वतःला ही कल्पना स्वीकारण्यात काही अडचणी आहेत असे वाटते. कारण ही कल्पना मूलादर्शावर आधारलेली आहे. कलाकृती या वर्गातील मूलादश है जर ठविता आले आणि त्या सर्व मूलादांची स्वरूप निश्चिती करता आली तर मग सर्व कलाकृतींची एक ताप्तुरती व्याख्या मलादर्शाच्या आधारे करता येते. आणि मूलादर्शाशी तुलना करून मोठया प्रमाणात साम्य असणे या मद्यावर ज्यावेळी आपण एखाद्या आकृतीला कलाकृती या वर्गाचे सभासद ठरव लागतो त्यावेळी मलादीशी समान सत्त्व नसणे ही कल्पना फिरून एकदा मीमांसेचा भाग होते. कलाकृती या वर्गात समान सत्त्व नसणे ही कल्पना स्वीकारल्यानंतर सर्व कलाकृती मलादर्शाशी मोठ्या प्रमाणात

१००

ओळख