पान:ओळख (Olakh).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठिंब्यावरच उभे असते. व्यक्तीविषयक विधानात सार्वत्रिक विधाने अनस्यत असतात. एकदा आपण हा मुद्दा मान्य केला तर मग मढेकरांच्या एकण विवेचनात महत्त्वाचा असणारा दुवा गळून पडल्यानंतर मढेकरांच्या सौंदर्यमीमांसेला सौंदर्यवाचक विधानार्थाचे स्वरूप सुसंगतपणे मांडता येणे शक्य नाही. दुसरी पाटणकरांनी न नोंदविलेली पण महत्त्वाची अशी एक बाब आहे की, संवाद, विरोध आणि समतोल ह्या कल्पना केवळ कलांपुरत्या मर्यादित अशा नाहीत. कलाक्षेत्राच्या बाहेर सर्वसामान्य जीवनव्यवहारातही संवाद, विरोध आणि समतोल या कल्पनांचा वापर होतोच. जर ही तिन्ही तत्त्वे कलांचा व्यवहार आणि कलांच्या वाहेर असणारा व्यवहार यांना समान असतील तर कलांची स्वायत्तता ठरविणा-या मीमांसेत कलांचा अ-कलांशी सारखेपणा दाखविणारी तत्त्वे अप्रस्तुत मानली पाहिजेत. यातून सुटका होण्याचा एकच मार्ग आहे. तो असा की संवाद, विरोध, समतोल या तत्त्वांची व्याख्या अशा प्रकारे करावी की, ज्यामुळे संवाद फक्त कला व्यवहारातच आढळावा आणि या व्यवहाराबाहेर अस गाया संवादापेक्षा त्याचे निराळेपण स्पष्ट व्हावे. अशी व्याख्या करणे जवळ जवळ अशक्य आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की, सर्वकलाप्रकारांतल्या सर्व कलाकृती ठरलेल्या दोनचार नियमांनीच सिद्ध होतात असे सांगणारी मीमांसा ही अंतिमतः तंत्रवादी मीमांसा असते. कारण अशी मीमांसा कलावंताचे हेतू आस्वादाचे रसिकाच्या मनावर होणारे परिणाम सौंदर्य संकल्पनेतून वाहेर ठेवते.

 पाटणकरांच्या या विवेचनाचा अजूनही एक महत्त्वाचा लाभ आहे. गेल्या काही वर्षांत मराठी समीक्षा जणू असे गृहीतच धरून चालली आहे की, कलांच्या क्षेत्रात लौकिकतावाद आणि जीवनवाद या भूमिका कायमच्या पराभत होऊन आता मागे पडलेल्या आहेत. पाटणकरांच्या विवेचनाचा एक अर्थ हाही आहे की, आशयप्रधान कलाप्रकारांच्या मोमांसेत जीवनबादी आणि लौकिकतावादी भूमिका सर्वात जास्त प्रभावी अशी असते तिचा पराभव होऊ शकत नाही. तात्त्विक भूमिका घेताना अलौकिकता स्वीकारणारे समीक्षक प्रत्यक्ष कलामीमांसा करताना सातत्याने लौकिकतावादाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची चर्चा करीत असतात. आपल्या विवेचनात पाटणकरांनी मराठी वाङमय समीक्षेतील काही लाडक्या कल्पनांचीही तपासणी केली आहे. अशा कल्पनांपैकी अनन्यसाधारणत्व ही समीक्षकांची एक लाडकी कल्पना आहे. केवळ मराठी साहित्य समीक्षेतच ही कल्पना आग्रहाने पुरस्कारली गेली आहे असे नाही. पाश्चिमात्त्य समीक्षेतही काही जणांनी ह्या भूमिकेचा आग्रही पुरस्कार केलेला आहे. अनन्यसाधारणत्वाची भूमिका कोणते चमत्कारिक प्रश्न

ओळख -७

९७