पान:ओळख (Olakh).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'बरोबर जो अनुभव येतो तो ब्रह्मानंदासारखा आनंदस्वरूप असणे भाग आहे. असल्याप्रकारचे मतभेद कोणत्याही विवेचनाशी येत राहणार. या मतभेदांपेक्षा महत्त्वाची गोष्ट प्राचीनांच्या विवेचनाकडे नव्या प्रकाशात पाहणे ही आहे व या दृष्टीने पाटणकरांनी ओघाओघाने विवेचनाच्या थरात संस्कृत-साहित्यशास्त्रातील प्रश्नांचे जे विवेचन केले आहे ते महत्त्वाचे आहे याची नोंद करणे भाग आहे. पाटणकर असे समजात की, सामान्यत्वे अलौकिकतावादी विवेचक आकृतींचा अधिक विचार करणारे असतात. त्यांना आशयापेक्षा आकार जास्त महत्त्वाचे असतात. संस्कृत रसव्यवस्था याबाबत महत्त्वपूर्ण अपवाद मानली पाहिजे. रसव्यवस्था आंकृतीचा विचार करीत नाही असे नाही, पण या व्यवस्थेतोल अलौकिकतावादांचा भर आशयावर आहे.
 पाटणकरांच्या विवेचनात अधूनमधून मकरांचा प्रतिवाद येत असावा हे अगदी स्वाभाविक आहे. मढेकरांच्या बहुतेक प्रमुख सिद्धांतांना पाटणकरांचे विवेचन विरोधी जाणारे असे आहे. ज्या संवाद, विरोध, समतोल या लयतत्त्वांवर मढेकरांचा फार मोठा भर आहे ती लय तत्त्वे अतिशय स्थूल आहेत. ललित वाङमयाच्या विवेचनात अपुरी पडणारी आहेत असे तर पाटणकरांना वाटतेच; पण संगीतातसुद्धा- ख्याल, धृपद या अभिजात संगीताच्या श्रेष्ठ आविष्कारातसुद्धा संगीतकारांना शब्द महत्त्वाचा वाटतो असे त्यांचे मत आहे. ज्या श्रेष्ठ कलाप्रकाराकडे पाहून मकरांनी शुद्ध संवेदना आणि त्यांची रचना यावर भर दिला व आपल्या मीमांसेची उभारणी केली त्या संगीत ‘कलेलासुद्धा ही मीमांसा अत्यंत असमाधानकारक वाटते, असे पाटणकरांचे म्हणणे आहे मढेकरांनी ज्या पद्धतीने माध्यमाच्या प्रश्नांचा विचार केला आहे तोही पाटणकरांना मान्य नाही असे मढेकरांच्या मीमांसेतले अनेक मुद्दे बाद करीत पाटणकरांचे विवेचन विकसित झालेले आहे. पाटणकरांच्या विवेचनामळे कलाक्षेत्रातील अलौकिकतावाद पराभूत होईल असे मला वाटत नाही. पण निदान मढेकरांच्या विवेचनपद्धतीत फारसा बारकावा आणि खोली नाही. इकडे जरी हे विवेचन लक्ष वेध शकले तरी तो पुढच्या विकासाला एक दिलासा राहील.

 मढेकरांच्या संदर्भात विषय निघालेला आहे. म्हणून मी थोडक्यात तीन मुद्दे इथे नोंदवू इच्छितो. त्यातील एक यापूर्वीच मढेकरांची तपासणी करताना तो नोंदवला गेलेला आहे. तो पुन्हा पाटणकरांनीही नोंदवला आहे आणि मुद्दा महत्त्वाचा आहे. मकर असे मानतात की, अहंनिष्ठ विधान यामागे अहंनिष्ठ संवेदना असतात. वस्तुनिष्ठ विधान, वस्तुनिष्ठ संवेदनावर आधारलेले असते. पाटणकरांनी हे मद्दाम स्पष्ट केलेले आहे की, प्रत्येक अहंनिष्ठ विधान (ह्याला ते व्यक्तीविषयक विधान म्हणतात) सार्वत्रिक विधानांच्या

ओळख

९६