पान:ओळख (Olakh).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारी अशी आहे. एकदा ही भूमिका घेतल्यानंतर कलासमीक्षेत कोणत्या संकल्पना उस्फूर्तपणे वापरल्या जातात यांची नोंद घेणे आणि या संकल्पना ज्यात ग्रथित झालेल्या आहेत अशा विधानांची एक तात्पुरती तरी यादी तयार करणे हे पहिले महत्त्वाचे काम ठरते. अशा प्रकारे उपलब्ध होणा-या विधानांमधील आशय व त्यातील संकल्पनांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे हे पुढचे काम ठरते. या भमिकेचे एक महत्त्वाचे सामर्थ्य यात आहे की, कलामीमांसेच्या निमित्ताने जी मीमांसा आपण प्रस्तुत करू तिची उपयोगिता पूर्वसिद्ध असते. कलांच्या विवेचनासाठी एखादा सिद्धांत आपण मांडला तर हा सिद्धांत अकलापासून कलांचे जग वेगळे करण्यासाठी कसा उपयोगी पडतो आणि कलांचा हा सिद्धांत त्यांच्या मूल्यमापनासाठी किती मामिक ठरतो याचे वेगळे स्पष्टीकरण द्यावे लागते. म्हणजेच त्या सिद्धांताला स्वतःपेक्षा एक निराळे समर्थन लागते. पाटणकरांच्या पद्धतीने जाताना ही अडचण उपस्थित होत नाही. कलासमीक्षेत उस्फूर्तपणे वापरल्या जाणा-या संकल्पनांचा आधारच आरंभापासून या मीमांसेला असल्यामुळे कलाकृती जे प्रश्न उपस्थित करते किंवा कलामीमांसेला ज्या संकल्पनांची गरज असते, त्यांची मीमांसाच या कलेच्या विवेचनात आपोआप घडुन जाते. पाटणकर ज्या पद्धतीने विवेचन करतात त्यातून निर्माण होणान्या सिद्धांताची वीजे कलासमीक्षेतच खोलवर रुजलेली असल्यामळे या सिद्धांताला स्वत:पेक्षा निराळ्या अशा समर्थनाची गरज लागत नाही. हे या पद्धतीचे सामर्थ्य आहे. मढेकर ज्या पद्धतीने विवेचन करतात त्या पद्धतीची अंगभूत दुवळी जागा या ठिकाणी आहे. खरोखरच मकरांची कलामीमांसा आपल्याला कलाकृतीचे रहस्य व सामथ्र्य उकलन दाखविते काय ? हा प्रश्न विचारता येतो आणि त्याचे समाधानकारक उत्तर कधी देता येत नाही.

 पण पाटणकर ज्या मार्गाने जातात त्या मार्गाच्या काही मर्यादाही स्पष्ट होणे आवश्यक आहे. कलासमीक्षेत ज्या संकल्पना वापरल्या जातात त्यांचे विश्लेषण करणे हे आपले कार्य आहे असे पाटणकर म्हणत नाहीत. कारण कलासमीक्षेत कोणत्याही संकल्पना वापरल्या जातात. कलाकृती ही शेवटी समाजासमोर उभा असणारी वस्तू असते. ( या ठिकाणी ' वस्तु' हा शब्द अत्यंत ढोबळ अर्थाचा समजायचा) या वस्तूकडे समाजाने कसे पाहायचे याबाबत कोणतेच बंधन टाकता येत नाही. काही जणांसाठी या कलाकृती खरेदी-विक्रीच्या वस्तू असतात. या खरेदी-विक्री करणान्यांच्या दृष्टीने जिचा मोबदला जास्त देण्यास गि-हाईक तयार असते ती वस्तू श्रेष्ठ असते. 'अ' हा गायक कार्यक्रमाचे ५०० रु. घेतो. 'ब' हा गायक तसा नाही. तो मोठा कलावंत असल्यामुळे १००० रु. खाली आपला कार्यक्रम देत नाही. अशा प्रकारची

९२

ओळख