पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________


वातावरण निर्मिती

माध्यमे चळवळ गतिमान करतात...

 मानव लोक समाज विज्ञान महाविद्यालय, आंबेजोगाईच्या विद्याथ्र्यांनी जिल्ह्यातील प्रमुख गावात ग्रामसभेचे महत्व, स्त्री पुरुष समानता, मुलींची कमी होणारी संख्या या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. १० दिवस मुलामुलींनी एकत्र येऊन निकोप वातावरणात सादर केलेली पथनाट्ये प्रभावी ठरली.
 ग्रामसभेला येण्याबाबत आवाहन करणारी ऑडिओ क्लिप आणि चित्ररथ गावा-गावांतून लोकांचे लक्ष वेधून घेत होते. पथनाट्याची टिम रस्त्याने चालताना हातातील काठ्यांचा आवाज करत गाणी म्हणत गावागावात वातावरण निर्मिती करत फिरत होते.
 बीड आकाशवाणीवरील रेडिओ जिंगल्स वातावरण निर्मितीत भर टाकीत होते. पथनाट्य, चित्ररथ, रेडिओ जिंगल्स, स्थानिक केबलवरील मुलाखती, चर्चा व आवाहन करणा-या जाहिराती यामुळे ग्रामसभा प्रत्यक्ष होण्यासाठी उत्तम वातावरण निर्मिती झाली.