पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

बीड जिल्हा

चंपावतीचा बीड बदलतोय...

 बीड जिल्हा हा राज्यातील मुलींची संख्या कमी असणारा जिल्हा. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०१५ रोजी ९० गावांमध्ये ख-याखु-या ग्रामसभा झाल्या. या सर्व ग्रामसभांमध्ये 'गर्भलिंग निदान आपल्या गावामध्ये होवू दिले जाणार नाही. असा ठराव पारित करण्यात आला. हुंड्याच्या प्रश्नावर ग्रामसभेत उघडपणे चर्चा झाली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामीण पोषण आहार व स्वच्छता समितीच्य सदस्यांनी प्रशिक्षण पश्चात ग्रामसभा होण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
  सर्व तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसभेसाठी निवडलेल्या निरीक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या. सरपंच ते जिल्हापरिषद सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय झाले होते. ग्रामसेवकापासून जिल्हाधिका-यांपर्यंत सर्व प्रशासक २६ जानेवारीच्या ग्रामसभेस सज्ज झाले होते. प्रसिध्दी माध्यमातील प्रतिनिधी प्राधान्याने या उपक्रमाविषयी लिहिते झाले होते.
 माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ए.एन.एम. श्रीमती सोनवणे, परळीचे डॉ. एस.बी. साफे, शिरुर कासारचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे, ए.एन.एम. शकुंतला ठोंबरे, बीडचे आरोग्य अधिकारी डॉ. कासार, अॅड. अंबादास आगे, लिगल कौन्सिलर अॅड. करुणा टंकसाळ, ज्योतीराम हारकुंडे, सरपंच रंजना हारकुंडे, वडवणीच्या सरपंच मीरा उजगरे हे आपआपल्या विभागात, तालुक्यात घरचे कार्य असल्याप्रमाणे कार्यरत झाले होते.
 लेड लाडकी अभियानाचे कैलास जाधव, बाजीराव ढाकणे, पत्रकार शशी केवडकर, जिल्हाधिकारी श्री. नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नविनचंद्र रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. वडगावे, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नामदेव ननावरे या सर्वांनी या महत्वपूर्ण उपक्रमाचे समर्थपणे नेतृत्व केले. संपूर्ण 'लेक लाडकी' अभियानाला म्हणजेच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला चळवळीचे स्वरुप देणारा, ग्रामसभा सक्षम करणारा हा उपक्रम इतर जिल्ह्यातील कामासाठी मार्गदर्शक ठरला.