पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोल्हापूर जिल्हा keshop ताराराणी लढायला सज्ज आहे... | कोल्हापूर हा २००१ आणि २०११ दोन्हीही जनगणणेच्या अहवालानुसार मुलींच्या संख्येबाबत जोखमीचा जिल्हा ठरला आहे. कुलस्वामिनी आंबाबाईची कुलदैवत म्हणून पुजा करणा-या कोल्हापूर जिल्ह्यात गर्भात मुलींना गायब करण्याचे प्रकार वाढते राहिले आहे, ही बाब चिंतेची आहे. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शनासाठी हजर राहून न्यायीक अधिका-यांनी संवेदनशिलता दाखविली. मार्गदर्शन करताना त्यांनी 'स्त्रीयांनीच या गोष्टींचा विरोध केला पाहिजे' असे नमूद केले. त्यांच्यासह न्यायमुर्ती श्री. एस. व्ही. पाटील हे हजर होते. जिल्हा न्यायाधीश हे तालुका स्तरावरील ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता सदस्यांच्या प्रशिक्षणादरम्यान आशा, अंगणवाडीताई यांच्याशी संवाद साधायला आल्याने प्रसिध्दी माध्यमांनीही त्याची विशेष नोंद घेतली. | भद्रकाली ताराराणीने नेतृत्व केलेल्या या जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वडगणे, पुलाची शिरोली, वडींगे या ठिकाणी मुलींची संख्या घटली आहे. त्या प्रत्येक गावामध्ये जावून ग्रामीण आहार, पोषण व स्वच्छता समितीच्या सदस्यांना प्रशिक्षित करण्यात आले. | गाव निहाय गरोदर मातांशी संवाद साधण्यात आल्याने गरोदर माताच या गोष्टींना विरोध करायला उभ्या राहतील हा विश्वास कोल्हापूरमध्ये अभियान राबविताना आला आहे. लेलाडकी । ॥ मि । १५ ३ ५ । , 7 र