पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उस्मानाबाद जिल्हा शक्तीपीठाचा सन्मान करू... जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत ननावरे, जिल्हा परिषदेच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुमन रावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे समन्वयक श्री तुकाराम नवले, अॅड. वर्षा देशपांडे यांनी दीप प्रज्वलीत करुन ग्रामीण आरोग्य स्वच्छता व आहार समितीच्या प्रशिक्षणाचे उदघाटन केले. ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या परस्पर संवादातून कार्यशाळा संपन्न झाली.या प्रशिक्षणाच्या दरम्यान ‘जिल्हयातील सर्व पदाधिका-यांचे वाढदिवस हे लाडक्या लेकींचा दिवस म्हणून साजरे करण्यात यावेत' असे आवाहन अॅड.वर्षा देशपांडे यांनी केले. | यावेळी बोलताना अॅड. धिरज पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयात तुळजापूर आहे.जो माझा मतदार संघ आहे.या ठिकाणी महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक शक्तीपीठ तुळजा भवानी या स्त्रीची पूजा केली जाते आणि म्हणूनच उस्मानाबाद जिल्हयात सर्व नागरिकांनी ख-या अर्थाने धर्माचरण करावे, एका बाजूला तुळजाभवानीची पुजा करायची आणि दुस-या बाजूला गर्भातील मुलींशी दुजाभावाने वागायचे हा दांभीकपणा सोडून आपण उस्मानाबाद जिल्हयातील हा कलंक नाहीसा करु. त्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असून ही निर्धारसभा आहे." भूम आणि वाशी या दोन तालुक्यातील मुलींची संख्या चिंताजनकरित्या कमी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्य मोठया प्रमाणावर प्रशिक्षणासाठी हजर झाले. जिल्हापरिषद अध्यक्ष व तुळजापूर महिला बाल कल्याण सभापती या कार्यक्रमास हजर होते. या सदस्यांनी आपला वाढदिवस हा लाडक्या लेकिंचा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहिर केला. सदर प्रशिक्षणामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय कार्यक्रमाचा कृती आराखडा बनण्यास मदत झाली. सदर कार्यक्रमाला गती मिळाली. सरपंच, आशा, अंगणवाडीताई यांचा सहभाग वाढला. हा कार्य जह HIFI .