पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

औरंगाबाद जिल्हा । । । । धार्मिक उत्सवात मुलींचे जन्मोत्सव साजरे होतात.... | औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी समजली जाते. महाराष्ट्रातील महत्वाच्या महानगरांपैकी एक महत्वाचे महानगर, ज्या ठिकाणी स्त्रीविषयक हिंसा व मुलींची कमी होणारी संख्या हा गंभीर प्रश्न आहे. अशा ५० प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षीत करुन जिल्ह्यामध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान प्रत्येक गावापर्यंत ग्रामीण पोषण आहार व स्वच्छता समिती मार्फत नेण्यात आले. जिल्ह्यातील १०० गावे जोखमीची म्हणजेच मुलींची संख्या कमी असणारी आहे. | या परिक्षेत्राचे आयुक्त उमाकांत दांगट यांनी पुढाकार घेऊन आठ जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांसोबत मुलींची कमी होणारी संख्या आणि गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी या बाबत चर्चा आयुक्तालय कार्यालय औरंगाबाद येथे घडवून आणली, या बैठकीस अॅड. वर्षा देशपांडे मार्गदर्शक म्हणून हजर होत्या. प्रशिक्षणानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील पर्यवेक्षीका अतिशय प्रभावीपणे लेक लाडकी अभियानात सक्रीय झाल्या आहेत. ही बाब या जिल्ह्यातील विशेषत्वाने वाखाणण्यासारखी आहे. गरोदर मातांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी संपर्क साधून गावागावातून गर्भलिंग निदानाची माहिती गोळा केली आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव यासारख्या धार्मिक उत्सवांमध्ये मुलींचे जन्मोत्सव साजरे होत आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृह Capacity Building Workshop of Master Trainers Train Village Health Nutrition and B Sanitation Committee Members Beti Bachav Beti Padhav Abhiyan Unpa Lek Ladhal Abhiyan