Jump to content

पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ छत्रपती महाराज सा जळगांव जिल्हा लेकींसाठी वासंती धडपडते... एकेकाळी 'वासनाकांड' मुळे चर्चेत असणारा जिल्हा पुन्हा एकदा मुलींची कमी होणारी संख्या, बालिका हत्या या बाबतीत अग्रेसर आहे. जिल्हयाची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. श्री. संजय मस्कर (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगांव) यांच्या उपस्थितीत झाडाला पाणी घालून प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. | मूळचे सातारचे श्री. संजय मस्कर यांनी डिकॉय ऑपरेशनवर भर दिला आहे. दुष्काळ हे आस्मानी संकट तर मुलींची संख्या कमी होणे हे सुलतानी संकट जळगाव जिल्ह्यावर कोसळले असून सर्व घटकांनी सक्रीय व संघटीतपणे यावर मात करण्याचा निर्णय करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. जळगाव जिल्हयातून सुरतला आणि नाशिक जिल्हयात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपातासाठी नेले जात असल्याचे प्रशिक्षणार्थीनी सांगितले. संजय मस्कर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मीरे, सामाजिक कार्यकत्र्या वासंती दिघे यांच्या नेतृत्वाखाली जळगांव जिल्ह्यातील चित्र टप्प्याटप्प्याने बदलते आहे. वासंती दिघे यांनी पुढाकार घेवून डिकॉय ऑपरेशन करुन कायद्याचा वचक जिल्ह्यावर बसवला आहे. जळगांव जिल्हा महिला संघटना 'लेक लाडकी अभियाना' सोबत सक्रीयपणे भूमिका घेत आहे. प्रशिक्षणामुळेच गावागावात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ची चर्चा आशा व ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांमुळे सुरु झाली. A FIR - RIB સાદ