पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जालना जिल्हा स्त्रिया मालकीणी होत आहेत.... | हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा, दुष्काळी आणि स्त्री विषयक हिंसेमध्ये अग्रणी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ३०% मुलींचे विवाह हे बाल वयात केले जातात. त्यामुळे मुलगी नको ही मानसिकता असणा-या जिल्ह्यात लेक लाडकी अभियान चालविणे एक आव्हानच आहे. वस्तुस्थिती बदलण्यासाठी सर्व घटकांसह कालबध्द कृती आराखडा आखणे आवश्यक आहे. म्हणूनच प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय प्रशिक्षक प्रशिक्षीत करण्यात आले. जालना जिल्ह्यातील तरुण तडफदार आमदार संतोष दानवे यांनी भोकरदण येथे प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहून स्त्रीया आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे जन आंदोलन झाले पाहिजे, राजकारणा पलिकडे जाऊन नेत्यानी या बाबत संवेदनशील झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. शेती आणि शेती पूरक व्यवसायामध्ये स्त्रीयांना मालकी देण्या मध्ये भोकरदन तालुका नावाजला जात आहे. आता तालुक्यात मुलींची संख्या ही वाढती आहे. हुंडा देऊन घेऊन होणा-या बाल विवाहाला राजकीय पुढा-यांनी हजर राहू नये असे आवाहन लेक लाडकी अभियानाच्या वतीने करण्यात आले. वर्षा पवार या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या जिल्हा समन्वयक, मा. जिल्हाधिकारी श्री. शिवाजी जोंधळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील या तिघांनीही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमाला प्राधान्य दिले आहे. शेत जमिनींना नव-याबरोबर स्त्रीयांना सहमालक करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींची संख्या वाढविणे या चारीही आघाड्यांवर सक्रीय होण्याचा निर्णय प्रशासन स्तरावर आणि लोक प्रतिनिधींनीही जाहिर केला हे महत्वाचे असून ग्रामीण आरोग्य, आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळेच शक्य झाले आहे, असे मत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या समन्वयक श्रीमती वर्षा पवार यांनी नोंदविले.