पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनोगत


एकविसावे शतक स्वकर्तृत्वशाली माणसांचेच

 ‘एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न' हा मी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह होय. यातील एक अपवाद वगळता सर्वच लेख यापूर्वी विविध दैनिके, विशेषांक, नियतकालिके, ग्रंथ यात सुटे-सुटे प्रकाशित झाले आहेत. यातील प्रत्येक लेखाचा विषय व संदर्भ स्वतंत्र आहे. त्यामुळे ते प्रकाशनक्रमानुसार छापले आहेत. यातील अधिकांश एकविसाव्या शतकातच लिहिले आहेत. काही एक एकविसाव्या शतकाच्या स्पर्शकालातील वा संधिकालातील आहेत. पण त्यांचा लक्ष्यवेध मात्र एकविसावे शतक हाच आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश या संग्रहात केला आहे.
 एकविसाव्या शतकाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. माहिती व तंत्रज्ञान युगाने संगणक, इंटरनेट, उपग्रह, मोबाईलसारख्या साधनांनी स्थल व कालाच्या सीमारेषा पुसल्याने राष्ट्र, चलन, भाषा, दळणवळण, संस्कृती या गोष्टी जवळजवळ संपुष्टात आणल्या. डेकेल कराराने जागतिक व्यापारास गती आणली. पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्तमुळे महासत्तांचे स्वरूप व सत्ता केंद्र बदलले. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे नागरीकरण, मध्यम वर्गाचा कायाकल्प, संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांचे दुर्बलीकरण यातून विषमता कमी न होता वाढली. जग वरवर पाहता विकसित होताना दिसते. तो विकास भौतिक आहे. विज्ञानाने जी नवसाधने निर्मिली ती श्रीमंत वर्गाच्या सुखासाठी. मध्यमवर्ग सेवा क्षेत्रात जाऊन श्रीमंतांशी स्पर्धा करू लागला. ज्ञानाचे महत्व समाजातल्या सर्वच वर्गाला पटल्याने गरीबातील गरीबही इंग्रजी माध्यम सदृश आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून आग्रही बनला. स्त्रीकडे सत्ता,