पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शासन फारसं गंभीर नसल्याचं विनाअनुदान संस्कृती वाढीवरून स्पष्ट होतं. आपल्याकडे ‘अर्थशक्ती कमी आहे हे जितकं खरं तितकीच ‘इच्छाशक्ती कमी आहे हे अमान्य करून चालणार नाही. केवळ गुणवत्तेच्या निकषावर अथवा आर्थिक दुर्बलतेच्या निकषावर येथील सोयी-सवलतींची रचना जोवर होणार नाही तोवर ख-या अर्थाने शिक्षण (समाज शिक्षण)प्रसार होणार नाही. 'Mass Education' (समाज शिक्षण)च्या नावावर आपण 'Mob Education' (झुंड शिक्षण) रुजवतो आहोत याचे भान विद्यमान राज्यकर्त्यांना व सार्वत्रिक शिक्षणाच्या खंद्या समाजकत्र्यांना जोवर येणार नाही तोवर इथ रुग्णालयाशिवाय डॉक्टर घडतच राहणार. शिक्षणातील जातीय सवलती दुर्बलता जोपासणाच्या आहेत याचे केव्हा तरी समाजाला भान यायला हवे.
 ‘‘ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास आणि चिकाटी न सोडता अव्याहत प्रयत्न हीच आमची या झगड्यातील शस्त्रे आहेत," असे छत्रपती शाह महाराजांनी सांगितले होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेत व प्रक्रियेत यास मूठमाती दिल्यासारखी स्थिती आहे. सर्वांसाठी आरोग्य' योजनेच्या धर्तीवर ‘सर्वांसाठी शिक्षण' योजना आपण का नाही आखत? जिथं आपण जातीधर्मनिरपेक्ष आरोग्य योजना राबवू शकतो, यशस्वी करू शकतो तिथं शिक्षणात का नाही राबवू शकत? हे सर्व मतांच्या गणितांचेच खेळ नाहीत का? छत्रपती शाहुनी केलेल्या सुधारणांमागे समाजहिताच्या निकषापलीकडे काही परिमाण नव्हते हे आपण लक्षात घ्यायला हवे. छत्रपती शाह जनसामान्यांची जी काळजी घेत त्यामुळेच सामान्य सेवक त्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात ‘सरकारची तब्येत जगदंबेने निरोगी ठेवावी म्हणून रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे, असे उल्लेख आढळतात. वर्तमानात मात्र सरकारच स्वतःसाठी आई जगदंबेची कृपा भाकताना आढळते.

 छत्रपती शाहू महाराज विचाराने पुरोगामी होते. त्यांच्या करवीर सरकारच्या एका गॅझेटमध्ये मागासलेपणाची व्याख्या पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ग' अशी केली होती.आपण ‘क्रिमी लेयर' अजून निश्चित करू शकलो नाही. मंडल, सबरवाल असे नवनवे आधार शोधत आपण जातीयतेस खतपाणीच घालतो आहोत. शाहू महाराजांसारखी वैचारिक पारदर्शिता व स्पष्टपणा आपण अंगिकारणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. राजर्षी शाहूंच्या या गुणांचा गौरव रायबागच्या प्रजेने त्यांना धाडलेल्या एका पत्रात करताना म्हटले होते, 'सरकारचे औदार्य, गांभीर्य, भूतदया, प्रजा वात्सल्य तसेच सर्वांस सारखे वागविण्याची शैली वगैरे अनेक गुण व्यक्त होतात. त्यासंबंधी वर्णन करावे तितके थोडे आहे. असा राजकार्यकुशल, निपुण, सहृदय व गुणवान प्रभू आम्हास आमच्या सुदैवाने मिळाला, ही आमच्या प्रजाजनांची

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/२४