पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व माध्यमांची अंगे असली तरी भाषिक प्रतिभा व प्रभुत्वाच्या बळावर तुम्ही इथे राज्य करू शकता हे आय. बी. एन. सारख्या वाहिनीवरून लक्षात येते. इथेही राज्य, राष्ट्र, जग अशी विस्तारणारी साम्राज्ये तुम्ही भाषेच्या जोरावर पादाक्रांत करू शकता. चांगले प्रश्न विचारता येणे, मुलाखत खुलवता येणे, वृत्ताचे कमी वेळात प्रभावकारी विश्लेषण करता येणे, प्रतिस्पर्ध्यावर मात ही सारी राजकीय कौशल्ये आता छायाचित्रकार, मुलाखतकार, ध्वनिमुद्रणकार, छायांकनकार (व्हिडिओ शूटर) यांच्यात केंद्रित झाली ती भाषिक साधन व सामथ्र्यावर. भाषा फिरवणे, वळवणे, वापरणे ज्यांना लीलया जमते तो चांगला अँकर, डी.जे. आर. जे. होऊ शकतो. तीच गोष्ट छायाचित्रण व ध्वनिमुद्रणास आज लागू पडते. कार्यक्रम होत असताना पाहणे, युद्धाचा प्रत्यक्ष थरार अनुभवणे या गोष्टी छायाचित्रकारांमुळे शक्य होतात. गौतम राजाध्यक्ष हे या क्षेत्रातले ठळक उदाहरण. सत्यजीत रे हा आदर्श. यामुळे या क्षेत्रास आज सोनेरी दुनिया म्हटले जाते ते उगीच नाही. आवाजाची अमीन सयानी जादू कोण नाकारेल?
जाहिरात क्षेत्र
 पूर्वी जाहिरात केवळ मुद्रित असायची. तीत चित्रे नसायची. असायचे ते फक्त शब्द आणि शब्द. ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने' असे ते रूप होते. मग जाहिरात सचित्र झाली. बोलकी व दृश्य झाली. ध्वनिमुद्रण किमयेमुळे रेडिओ जाहिरातीचे प्रभावी माध्यम बनले. श्राव्यजाहिरात (जिंगल्स) आज कोट्यवधींची उलाढाल करत आहे. दूरदर्शन, चित्रपट, वाहिन्या (चॅनल्स) मुळे जाहिरात दृक-श्राव्य बनली तशी जाहिरातीतील भाषेचे सामर्थ्य वाढले. ढूँढते रह जाओगे', 'कर लो दुनिया मुट्ठी में', 'थ्री इन फ्री' यासारख्या जाहिराती आबालवृद्धांच्या तोंडी एकाच वेळी घोळतात, ते भाषिक बळावरच. जाहिरात विश्वात एका शब्दाला एक कोटी रुपये मिळतात. या क्षेत्रात कल्पना, प्रतिभा, दृष्टी, भाषा, संगीत, वादन, गायन, भाषण, लेखन, सान्याला सारखे महत्त्व असते. जाहिरातीची उलाढाल अब्जावधी आहे. वृत्तपत्रे व वाहिन्या चालतात त्या जाहिरातीवर. इथे भाषा सर्वस्व असते. सत्ता जाहिरातीवर उगवते व जाहिरातीमुळेच कोसळते म्हणतात, त्यात भाषाही जादूच असते.

 या प्रमुख क्षेत्रांशिवाय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, कार्यक्रम संयोजन, (इव्हेंट मॅनेजमेंट), ध्वनि अभिनय (व्हाईस ओव्हर), सजावट, फॅशन, आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, गायन या क्षेत्रातही भाषेचे असाधारण महत्त्व असते. तिथंही तुम्हास कीर्ती, प्रसिद्धी, मान्यता, प्रतिष्ठा, संपत्ती

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८९